WATCH: शाकीब अल हसन भडकला, रागाच्या भरात असं काय केलं... Video Viral

Bangladesh Cricketer Shakib Al Hasan: गर्दीतून कोणीतरी त्याची टोपी काढली. त्यानंतर शाकिबचाही संयम सुटला. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Bangladesh Cricketer Shakib Al Hasan
Bangladesh Cricketer Shakib Al HasanDainik Gomantak

Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Video Viral: क्रिकेटपटू असो किंवा मोठे सेलिब्रेटी, कधी कधी गर्दीत त्यांचा संयम सुटतो. असाच काहीसा प्रकार बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकीब अल हसनसोबत घडला. गर्दीतून कोणीतरी त्याची टोपी काढली. त्यानंतर शाकिबचाही संयम सुटला. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाकिबचा संयम सुटला

बांगलादेशचा (Bangladesh) दिग्गज क्रिकेटपटू शाकीब अल हसनची मैदानावरील कृतीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. कधी तो विरोधी खेळाडूशी भांडतो तर कधी त्याच्या सहकाऱ्यांशी.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाकिबचा संयम सुटलेला दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका चाहत्याने गर्दीतून त्याची टोपी हिसकावून घेतली. त्यानंतर शाकिबचा संयम सुटला आणि त्याने थेट चाहत्याबरोबर हुज्जत घातली.

Bangladesh Cricketer Shakib Al Hasan
शाकिब अल हसन बनला बांगलादेशचा कसोटी कर्णधार, बंदीमुळे हिरावले होते कर्णधारपद!

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

शाकिबचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. विशेषत: बांगलादेश क्रिकेटमध्ये त्याला वादात राहणे आवडते असे म्हणता येईल.

मैदानावरील त्याच्या कृत्यांमुळे तो अनेक प्रसंगी चुकीच्या कारणांसाठी ठळकपणे प्रसिद्ध झाला आहे. ताजी घटनाही यापेक्षा वेगळी नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कडेकोट बंदोबस्तात शाकिब गर्दीतून बाहेर पडत असताना एका चाहत्याने त्याची टोपी हिसकावून घेतली. त्यांनतर शाकिबचा संयम सुटला आणि त्याने त्याच टोपी ओडणाऱ्याला मारहाण केली.

Bangladesh Cricketer Shakib Al Hasan
Cristiano Ronaldo Video: अल-नासरसाठी रोनाल्डोची तीन सामन्यात दुसरी हॅट्रिक, पाहा कसे केले गोल

शाकिबने प्रतिक्रिया दिली

शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला.

यानंतर शाकिब म्हणाला की, 'आम्ही ज्याप्रकारे कामगिरी केली, ती अप्रतिम होती. जेव्हा आम्ही गोलंदाजी करत होतो तेव्हा, सामना आमच्या आवाक्याबाहेर दिसत होता, पण कोणीही घाबरले नाही. प्रत्येकाला काय करायचं आहे हे माहीत होतं.

सर्व गोलंदाज आपल्या प्लॅनवर ठाम राहिले. माझ्या झेल व्यतिरिक्त सर्वांनी खूप चांगले क्षेत्ररक्षण केले. याआधी बांगलादेशला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com