ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अव्वल, पण सर्वाधिक डॉट बॉलही याच्याच नावावर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

यंदाच्या आयपीएलमध्ये क्वालिफायर-१ सामन्यापर्यंत झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

दुबई: यंदाच्या आयपीएलमध्ये क्वालिफायर-१ सामन्यापर्यंत झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केलेल्या एकूण धावा पाहता ऑरेंज कॅप त्यालाच मिळण्याची शक्‍यता आहे, पण सर्वाधिक धावा करणारा हा फलंदाज यंदा सर्वाधिक डॉट बॉल (निर्धाव चेंडू) खेळणाराही फलंदाज ठरला आहे. गोलंदाजीत सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज राजस्थानचा जोफ्रा आर्चर ठरला आहे. 
वास्तविक या दोघांच्या संघाचे आव्हान संपुष्टात आलेले आहे.

संबंधित बातम्या