Video: कोण आहे जसप्रीत बुमराहचा गुरु?

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

शेन बाँड जेव्हा खेळत असे तेव्हा मी त्याच्या गोलंदाजीबद्दल खूप उत्साही असायचो. 

जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो आणि त्याच्या अॅक्शनमुळे, उत्कृष्ट यॉर्करमुळे आणि चेंडूत बदल करण्याच्या कलेमुळे तो प्राणघातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडने आपली गोलंदाजी सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत आता जसप्रीत बुमराहने एक खुलासा केला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) पुढे ढकलल्यानंतर बुमराह आता इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दिसणार आहे.(Who is Jaspreet Bumrah's bowling coach)

Coronavirus: 'गोव्यातील सिनियर खेळाडूंची स्पर्धात्मक क्रिकेटची संधी...

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी भारतीय संघाबरोबर असलो तरीही मी शेनशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याबरोबरचा माझा प्रवास आतापर्यंत खूप चांगला झाला आहे आणि आशा आहे की मी दरवर्षी त्याच्याकडून शिकत राहील आणि माझ्या गोलंदाजीत आणखीन काही नवीन गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत राहीन असे बुमराह म्हणाला. माझी गोलंदाजी अधिक चांगली किंवा प्राणघातक बनविण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे. शेनशी माझे आतापर्यंतचे नाते खूप चांगले आहे आणि मला अशी आशा आहे की ते तशीच राहील असेही पुढेही तो म्हणाला.

शेन बाँड जेव्हा खेळत असे तेव्हा मी त्याच्या गोलंदाजीबद्दल खूप उत्साही असायचो. 2015 मध्ये बुमराह त्याला प्रथम भेटला. बुमराह लहान होता तेव्हा तो शेनला गोलंदाजी करताना पाहून खूप उत्साही व्हायचो. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा माझा अनुभव खूप चांगला होता आणि त्याने माझ्यामध्ये बरीच सुधारणा केली ज्याद्वारे मी मैदानात येऊ शकलो असे बुमराह म्हणाला. पुढे बुमराह म्हणाला की, माझे आणि शेनचे संबंध खूप चांगले आहेत आणि काळाबरोबर ते अधिक दृढ होत चालले आहेत.

 

संबंधित बातम्या