फिरकीपटूमध्ये अव्वल कोण? अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी सामन्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील स्पीनर गोलंदाज आर.अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 400 विकेट पूर्ण केले आहेत. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन नंतर सर्वाधिक वेगाने विकेट घेणारा जगातील दुसरा गोलंदाज तो ठरला आहे. तर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पूर्व भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने हरभजन सिंग आणि आर. अश्वीन यांची तुलना केली आहे.

गंभीर म्हणाला, ‘’वेगवेगळ्या काळांची तुलना करणं खूप कठीण आहे. मात्र मला आता असं वाटत की, जे ही मी आत्तापर्यंत क्रिकेट पाहिले त्यात स्पीनर गोलंदाज हरभजन सिंगला जास्त चांगलं मानतो. तो क्रिकट खेळत होता त्या काळात तो अत्युच्च शिखरावर होता. तसच आर.अश्विऩचा विचार केल्यास या काळातील सर्वश्रेष्ठ ऑफ स्पीनरमधील तो एक आहे. मात्र आर.अश्विनची हरभजन सिंगशी तुलना केल्यास ज्याप्रकारे अश्विनने विकेट घेताना वीना डिआरएस घेता शानदार प्रदर्शन केले  ते अतुलनीय आहे.’’

41, 44 की 46 शाहिद आफ्रिदीचा नेमका वाढदिवस कितवा...?ट्विटनंतर पेटला नवीन वाद

हरभजन सिंगने 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत. तर आश्विनने 77 कसोटी सामन्यामध्ये 401  विकेट घेतल्या आहेत. मात्र ''गौतम गंभीरने आश्विन आणि हरभजन सिंग यांची तुलना करत हरभजन सिंगला सर्वश्रेष्ठ मानले आहे. मात्र आश्विन एक कंप्लीट पॅकेज आहे.'' असंही गंभीर म्हणाला.    
 

संबंधित बातम्या