श्रेयस अय्यरच्या जागी कोण उतरणार मैदानात?

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

 सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामधून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

नवी दिल्ली: भारत-इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची सुरुवात झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघामधील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुध्दच्या उर्वरीत दोन एकदिवसीय़ सामन्यातून बाहेर पडला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागी संघव्यवस्थापनाकडून टी-ट्वेन्टी मालिकेमधून पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामधून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि गोलंदाज प्रसिध्द कृष्णा यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच एकदिवसीय सामन्यात कृणालने अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. (Who will replace Shreyas Iyer)

IPL 2021: धोनीनं CSK च्या चाहत्यांना दिलं सरप्राईज (VIDEO)

तर दुसरीकडे प्रसिध्द कृष्णा ने कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात 4 विकेट घेत भारतीय संघाला विजयी केले. तसेच बीसीसीआयने ट्विट करत श्रेयसला लवकर ठीक होऊन पुन्हा संघामध्ये सामील होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मागील सहा महिन्यात श्रेयसच्या खांद्याला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. या आगोदर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मर्यादीत षटकांच्या मालिकेत त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता मुंबईच्या सुर्यकुमार यादवला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.  

 

संबंधित बातम्या