आयपीएल २०२०:  विराट कोहलीच्या बंगळूरसाठी आज कोण ठरणार तारणहार?

वार्ताहर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

विराट-डिव्हिल्यर्स विरुद्ध केएल राहुल-अगरवाल सामना रंगणार

दुबई:  युझवेंद्र चहलच्या जादुई फिरकीमुळे सलामीच्या सामन्यात विजयाचा टिळा लागलेल्या विराट कोहलीच्या बंगळूर संघाचा उद्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना होत आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात दोघांनीही एकमेकांविरुद्ध प्रत्येकी १२ लढती जिंकलेल्या असल्या तरी उद्याच्या सामन्याचे भाकीत करणे कठीण आहे.

पंजाबला सुपरओव्हरमध्ये दिल्लीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तर बंगळूरने सलामीला विजय मिळवलेला आहे, असे असले तरी उद्याच्या सामन्यात दोन्ही संघांची ताकद समान आहे. विराट कोहली-एबी डिव्हिल्यर्स विरुद्ध केएल राहुल-मयांक अगरवाल असा हा मुकाबला असेल. 

पंजाब गोलंदाजीत उजवे
गोलंदाजी ही नेहमीच बंगळूर संघासाठी चिंतेची ठरलेली आहे. हैदराबादविरुद्ध समाधानकारक धावा केल्यानंतरही त्यांच्या हातून सामना निसटत होता; परंतु चहलने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट मिळवल्यामुळे त्यांना विजय मिळवता आला होता.

काय निर्णायक

  •  गेल्या दोन मोसमातील चारही सामन्यात बंगळूरची सरशी
  •   प्रतिस्पर्धी संघांच्या कामगिरीत सलामीला सातत्याचा अभाव, तसेच काहीसा विस्कळित खेळ
  •  पंजाबच्या फलंदाजांना या वातावरणात कसे खेळावे याचाच प्रश्‍न सतावत आहे, तो यावेळीही सुटेल असे वाटत नाही
  •  पंजाबच्या तुलनेत बंगळूरची फलंदाजी चांगली, पण गोलंदाजी चिंतेची बाब
  •  गेलबाबत पंजाबचा निर्णय काय असेल, तसेच ग्लेन मॅक्‍सवेल, मयांक अगरवाल, केएल राहुल डावाला कितपत स्थैर्य देणार

संबंधित बातम्या