सामन्याआधी धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसून त्याची बॅट का चघळतो? अमित मिश्राने केला खुलासा

सामन्याआधी धोनी बॅटिंगला येण्यापूर्वी पव्हेलियनमध्ये बॅट चघळताना कॅमेरामध्ये दिसून आला.
सामन्याआधी धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसून त्याची बॅट का चघळतो? अमित मिश्राने केला खुलासा
MS DhoniDainik Gomantak

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) दिल्लीविरुद्ध आठ चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली आहे. त्याच्या फलंदाजीने आयपीएल पुन्हा एकदा गाजवले आणि धोनीचे चाहते सोशल मीडियावर आत्ता धुमाकुळ घातला जात आहे. या मॅचपुर्वी धोनी बॅटिंगला येण्यापूर्वी पव्हेलियनमध्ये बॅट चघळताना कॅमेरामध्ये दिसून आला. धोनी बॅट चघळताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही धोनीला अनेकवेळा ड्रेसिंग रूममध्ये बॅट चघळताना पाहिले गेले आहे. माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने धोनी असे का करतो याचा खुलासा केला आहे. (Why does MS Dhoni sit in the dressing room before the match and chew his bat Revealed by Amit Mishra)

MS Dhoni
ऋषभ पंतची फलंदाजी पाहून गर्लफ्रेंड ईशा नेगीने दिली प्रतिक्रिया; व्हिडिओ व्हायरल

अमित मिश्राने ट्विट केले की धोनीला आपली बॅट स्वच्छ ठेवायला आवडते, म्हणूनच तो ती बॅट चघळत बसतो आणि त्या बॅटची टेप काढत राहतो. याच कारणामुळे धोनी अनेकदा फलंदाजीपूर्वी बॅट चघळताना दिसून आला आहे.

काय होते अमित मिश्राचे ट्विट

अमित मिश्राने चेन्नई आणि दिल्लीच्या सामन्यानंतर ट्विट केले की, "तुम्ही विचार करत असाल की धोनी त्याची बॅट वारंवार का चघळत राहतो. तो त्याची बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करत असतो, कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. तुम्ही जिंकलात. 'त्याच्या बॅटमधून टेपचा तुकडा दिसून येत आहे." आयपीएलपूर्वी भारताच्या सामन्यादरम्यान धोनी आपली बॅट चघळतानाही दिसला.

धोनीच्या T20 मध्ये 6000 धावा

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने T20 मध्ये कर्णधार म्हणून 6000 धावा पूर्ण केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने ही कामगिरी केली होती, कोहलीने T20 मध्ये कर्णधार असताना 6451 धावा केल्या आहेत, तर एमएस धोनीने 6013 धावा केल्या आहेत.

MS Dhoni
CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले, जाणून घ्या कोण आहेत ते तीन खेळाडू

दिल्लीविरुद्ध धोनीची शानदार फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धोनी जुन्या रंगात दिसून आला आहे. त्याने आठ चेंडूंत नाबाद 21 धावा केल्या आहेत. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारून संपुर्ण मॅच फिरवली आहे. धोनीचा स्ट्राईक रेट 262.50 होता. त्याच्या खेळीमुळे चेन्नईचा संघ 208 धावा करू शकला आणि दिल्लीचा मोठ्या फरकाने चेन्नईने दिल्लीचा पराभव केला. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई विजयी मार्गावर परतली आणि अजूनही हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या कुठेतरी आशा दिसून येत आहेत. चेन्नईच्या संघाने 11 पैकी चार सामने जिंकले आहेत, तर सात सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या संघाचे आठ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावरती आहेत. चेन्नईने राहिलेले तीन सामने जिंकल्यास 14 गुणांसह ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.