माजी भारतीय कर्णधार धोनी एक उत्कृष्ट फिनिशर का होता, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले गुपित
Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak

माजी भारतीय कर्णधार धोनी एक उत्कृष्ट फिनिशर का होता, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले गुपित

महेंद्रसिंग धोनी हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने सलग 10 वर्षे एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल बेवन याने इंस्टाग्रामवर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचे कौतुक करताना एक पोस्ट केली आहे. धोनीच्या फोटोसह, त्याने सलग 10 वर्षे एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-10 फलंदाजांच्या यादीत त्याच्या उपस्थितीबद्दल लिहिले आहे. ही कामगिरी करणारा धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू असल्याचेही त्याने लिहिले आहे. यासोबतच मायकल बेवनने (Micheal Bevan) धोनीच्या शानदार फिनिशर असण्यामागचे कारणही उघड केले आहे. (Micheal Bevan on MS Dhoni)

Mahendra Singh Dhoni
Fathers Day: वडिलांचे निधन होऊनही 'या' दिग्गजांची सोडले नाही क्रिकेटचे मैदान

मायकल बेवनने लिहिले की, 'धोनी एक शानदार फिनिशर होता. या स्तराचा खेळाडू होण्यासाठी, तुम्हाला बर्‍याच चांगल्या कौशल्यांचे संयोजन आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणनीती. प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम शॉट्स निवडणे तुम्हाला तुमच्या संघासाठी सामने जिंकण्यात मदत करू शकते.'

Mahendra Singh Dhoni
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष शिरोडकरचे पहिले मोठे यश

धोनीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये नोंद, 10 हजारांहून अधिक धावा

एमएस धोनीने आपल्या करिअरमध्ये 350 वनडे खेळले. या सामन्यांच्या 297 डावांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. येथे 84 वेळा नाबाद राहताना त्याने 50.57 च्या फलंदाजीच्या सरासरीने 10773 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्रेट रेट 86.56 इतका होता. धोनीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 10 शतके आणि 73 अर्धशतके केली आहेत. तो भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 5वा खेळाडू आहे. तो सलग 10 वर्षे ICC ODI क्रमवारीतील टॉप-10 फलंदाजांच्या यादीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com