Irani Cup: बीसीसीआयने सर्फराज खानला का डावललं? अखेर खरं कारण आलं समोर

आगामी इराणी कपसाठी सर्फराज खानला रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान देण्यात आलेलं नाही, यामागचे कारण आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
Sarfaraz Khan
Sarfaraz KhanDainik Gomantak

Iran Trophy 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी इराणी कप 2023 स्पर्धेसाठी शेष भारतीय संघाची (Rest of India) घोषणा केली आहे. या संघात एकूण 16 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण या संघातून धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानला जागा मिळालेली नाही. मात्र, यामागचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

सर्फराजने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात 6 सामन्यांत खेळताना 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आत्तापर्यंतची कामगिरीही चांगली झाली आहे.

त्याने आत्तापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 13 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. पण असे असतानाही त्याला इराणी कपसाठी शेष भारतीय संघात समावेश कसा झाला नाही, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

Sarfaraz Khan
Team India वर बसतोय 'चोकर्स'चा शिक्का! गेल्या दहा वर्षातील तब्बल 15 ICC स्पर्धाच आहेत पुरावा

पण आता बीसीसीआयने माहिती दिली आहे की सर्फराज निवडीसाठी उपलब्ध नव्हता. कारण त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीला छोटे फ्रॅक्चर झाले आहे. त्याचमुळे त्याला संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्याऐवजी बाबा अपराजितला संघात स्थान मिळाले आहे.

दरम्यान, इराणी कपचा सामना 2021-22 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मध्यप्रदेश विरुद्ध शेष भारत संघात होणार असून हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. हा सामना कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर येथे होणार आहे.

Sarfaraz Khan
Sarfaraz Khan: सरफराज खानच्या निवडीबाबत मोठा खुलासा, BCCI चे सिलेक्टर्स म्हणाले...!

या सामन्यासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद मयंक अगरवालकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात यशस्वी जयस्वाल, यश धूल यांसारखे युवा खेळाडू आहेत. त्याचबरोबर अभिमन्यू ईश्वरन, अतीत शेठ, नवदीप सैनी, मुकेश कुमार यांसारखे अनुभवी खेळाडूंचाही संघात समावेश आहे.

इराणी ट्रॉफीसाठी शेष भारतीय संघ - मयंक अगरवाल (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, यश धुल, बाबा इंद्रजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), अतित शेठ, सौरभ कुमार, हार्विक देसाई, नवदीप सैनी, मुकेश कुमार, चेतन साकारिया, आकाश दीप, मयंक मार्कंडे, पुल्कित नारंग, सुदीप कुमार घरामी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com