हैदराबाद दिल्लीलाही बाद करणार?

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

हैदराबादचा संघ आता आणखी एका विजय मिळवण्याचा आत्मविश्‍वास बागळून आहे, दुसऱ्या बाजूला मुंबईकडून दारुण पराभव झालेला दिल्लीचा संघ नवी उमेद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा दोन संघांत आज होणारा सामना आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार आहे.

अबुधाबी :  दिल्लीसह मात्तबर संघांना पराभूत करून प्लेऑफ गाठणाऱ्या आणि एलिमिनेटर सामन्यात बंगळूरला बाहेरचा रस्ता दाखवून हैदराबादचा संघ आता आणखी एका विजय मिळवण्याचा आत्मविश्‍वास बागळून आहे, दुसऱ्या बाजूला मुंबईकडून दारुण पराभव झालेला दिल्लीचा संघ नवी उमेद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा दोन संघांत आज होणारा सामना आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार आहे.

सलग चार पराभवानंतर अखेरच्या साखळी सामन्यात विजय आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये मोठा पराभव असा दिल्लीचा गेल्या सहा सामन्यांतला प्रवास राहिलेला आहे, तर हैदराबाद सलग चार विजय मिळवून प्रगती करत आहे. आत्मविश्‍वासाच्या निकषावर हैदराबादचे पारडे निश्‍चितच जड आहे, परंतु दिल्लीचा संघ आता तरी मरगळ झटकणार का? यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.  क्वालिफायर-१ सामन्यात मुंबईकडून झालेला पराभव दिल्लीला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा ठरला आहे. वेगवान गोलंदाजी ही दिल्लीची खासियत होती; परंतु कागिसो रबाडा आणि नॉर्किया यांनी मुंबईविरुद्ध दोघांच्या आठ षटकांत मिळून ८९ धावा दिल्या होत्या. 

  • यंदाच्या स्पर्धेतील दोन्ही सामन्यात हैदराबादचा विजय
  • दोन्ही सामन्यात हैदराबादची प्रथम फलंदाजी
  • दुसऱ्या साखळी सामन्यात हैदराबादकडून २१९ धावा
  • दोन्ही सामन्यात दिल्लीची गोलंदाजी, फलंदाजी निष्प्रभ

खेळपट्टीचा अंदाज : अबुधाबीतील खेळपट्टीवर हिरवे गवत असले तरी खेळपट्टी संथ, शुक्रवारी बंगळूरकडून जेमतेम १३१ धावा. फटकेबाजीचा प्रयत्न केल्यास बाद होण्याची भीती. सावध फलंदाजी केल्यावर धावा होऊ शकतात. 
ठिकाण ः अबुधाबी. वेळ ः सायंकाळी ७.३० पासून.

संबंधित बातम्या