टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळणार का? सरकारचे मोठे वक्तव्य

पाकिस्तानात (Pakistan) पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे.
टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळणार   का? सरकारचे मोठे वक्तव्य
Babar Azam & Virat KohliDainik Gomantak

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. 2025 मध्ये ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानात (Pakistan) पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीची स्पर्धा होणार आहे. याआगोदर 1996 च्या विश्वचषकाचे सामने इथे खेळले गेले होते. तेव्हा भारत आणि श्रीलंकेसह (Sri Lanka) पाकिस्तान विश्वचषकाचे संयुक्त यजमान होते. परंतु आता प्रथमच पाकिस्तान स्वबळावर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे भारताचे पाकिस्तानात जाण्याचेही एक प्रकारे निश्चित झाले आहे. कारण आयसीसीच्या इव्हेंटवर बहिष्कार टाकणे अवघड आहे. मात्र भारत त्यात खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्येही दोन्ही देशातील सरकारांची भूमिका ही महत्त्वाची आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यानंतर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे यासंदर्भातील वक्तव्य आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, वेळ आल्यावर भारत सरकार आणि गृह मंत्रालय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेईल. इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दरम्यान सर्व बाजू बघून निर्णय घेतला जातो, तसे पाहता जगातील अनेक देश पाकिस्तानचा दौरा करण्यास टाळाटाळ करतात. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाल्यापासून कोणत्याही मोठ्या संघाने तेथे दौरा केलेला नाही. नुकताच इंग्लंड, न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला.

Babar Azam & Virat Kohli
BCCI चे बल्ले-बल्ले! तिजोरीत येणार 1500 कोटी, सौरव गांगुली-जय शाह जोडी कमाल

अलीकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने फक्त आयसीसीच्या कार्यक्रमांदरम्यानच होतात. यामध्ये विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. अलीकडेच, यूएईमध्ये टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना झाला होता. यापूर्वी 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला होता.

2012 पासून भारत-पाकिस्तानने आपापसात मालिका खेळलेली नाही

2005-06 मध्ये भारताने शेवटचा पाकिस्तानला भेट दिली होती. त्याच वेळी, या दोन देशांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली गेली होती, जेव्हा पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. तेव्हापासून, दोन्ही देश आयसीसी स्पर्धा आणि आशिया कप यांसारख्या स्पर्धांशिवाय एकमेकांशी खेळत नाहीत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची मागणी सातत्याने जोर धरत आहे, मात्र दोन्ही देशांमधील परिस्थितीमुळे तसे करणे शक्य होत नाही. अलीकडे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अडचणीही वाढल्या आहेत.

त्याच वेळी, आयसीसीने 2024 ते 2031 या आठ वर्षांत भारताला तीन मोठ्या स्पर्धांचे यजमानपद दिले आहे. याअंतर्गत 2026 मध्ये टी-20 वर्ल्ड कप, 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 मध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. भारताला सर्वाधिक होस्टिंगचे अधिकार मिळाले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com