ICC Women's T20I Team मध्येही टीम इंडियाचीच हवा! मानधना-दीप्तीसह 4 महिला क्रिकेटपटूंना स्थान

आयसीसीने जाहीर केलेल्या 2022 टी20 महिला संघात भारताच्या तब्बल चार खेळाडूंना संधी मिळाली आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak

ICC Women's T20I Team: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी 2022 वर्षाचा सर्वोत्तम महिला टी20 संघ जाहीर केला आहे. या संघात 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या संघात सर्वाधिक भारतीय महिला संघातील 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारताच्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, रिचा घोष आणि रेणूका सिंग यांना या टी२० संघात संधी मिळाली आहे. भारताच्या या चार क्रिकेटपटूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे. यामध्ये बेथ मूनी, ऍश गार्डनर आणि ताहिला मॅकग्रा या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

India Women Cricket Team
ICC Men's T20I Team मध्ये टीम इंडियाचा बोलबाला, विराट-सूर्यासह तीन क्रिकेटर्सला संधी

त्याचबरोबर न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघातील प्रत्येकी एका महिला खेळाडूला आयसीसीच्या 2022 टी20 महिला संघात संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या सोफी डिवाईन हिला संधी मिळाली असून तिला या संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.

तसेच इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, श्रीलंकेची इनोका रणवीरा आणि पाकिस्तानची निदा दार यांना या संघात जागा मिळाली आहे.

( ICC Women's T20I Team 2022 Announced)

भारतीय महिला क्रिकेटपटूंची कामगिरी

आयसीसी टी20 संघात संधी मिळालेल्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, रिचा घोष आणि रेणूका सिंग या चौघींचीही कामगिरी 2022 वर्षात चांगली झाली होती. स्मृतीने 2022 वर्षात 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 33 च्या सरासरीने 594 धावा केल्या होत्या. तिने या दरम्यान 5 अर्धशतकेही झळकावली. यातील एक अर्धशतक तिने श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात केले होते.

तसेच दिप्ती शर्माने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात कामगिरी केली. तिने फलंदाजी करताना 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 370 धावा केल्या. तसेच तिने 29 विकेट्सही घेतल्या. तिने आशिया चषकात गेल्यावर्षी 13 विकेट्स घेतल्या. ती या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरली होती.

India Women Cricket Team
U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांचा श्रीलंकेला धोबीपछाड, सेमीफायनलच्या आशाही जिवंत

त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषनेदेखील 2022 वर्षात चांगली कामगिरी केली. तिने आक्रमक फलंदाजी करताना जवळपास 150 च्या स्ट्राईकरेटने 259 धावा केल्या. यादरम्यान तिने 13 षटकार मारले. तिने भारताची खालची फळी चांगल्याप्रकारे सांभाळली. तिची वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली. त्यावेळी तिने 19 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी केली होती.

आशिया चषक 2022 अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली रेणूका सिंगने गेल्या वर्षात 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तिला 2022 मधील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे. तिची 10 धावात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली.

आयसीसी टी20 महिला संघ 2022: स्मृती मानधना (भारत), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), सोफी डेव्हाईन (कर्णधार)(न्यूझीलंड), ऍश गार्डनर (ऑस्ट्रेलिया), ताहिला मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), निदा दार (पाकिस्तान), दीप्ती शर्मा (भारत), रिचा घोष (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), इनोका रणवीरा (श्रीलंका),रेणूका सिंग (भारत).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com