Women's Asia Cup 2022: महिला आशिया चषकाला 1 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

Women's Asia Cup 2022: पुरूष आशिया चषकानंतर आता येत्या 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकालाही सुरुवात होणार आहे.
Women’s T20 Asia Cup
Women’s T20 Asia CupDainik Gomantak

पुरूष आशिया चषकानंतर येत्या 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाला देखिल सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यासह बहुतेक देशांनी आपपल्या संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

महिला आशिया चषकात एकूण सात संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानसह श्रीलंका आणि मलेशियाच्या देशाने आपापल्या संघाची घोषणा केली आहे. तर, थायलंड, यूएई आणि बांग्लादेश त्यांच्या संघाची घोषणा करणार आहे.

* हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघांची धुरा

आगामी महिला आशिया चषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे (Indian Team) नेतृत्व करणार आहे. तर, स्मृती मानधनाच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय, रिचा घोषची भारताच्या संघात विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आली आहे. दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांच्यासह जेमिमा रोड्रिग्ज आणि सबिनेनी मेघना यांनाही संधी देण्यात आली आहे. पण यास्तिका भाटियाला या स्पर्धेत भारतीय संघात जागा मिळाली नाही.

भारतीय महिला क्रिकेट संघ-

हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.

राखीव खेळाडू- तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर

Women’s T20 Asia Cup
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती, या खेळाडूला मिळाली संधी

श्रीलंकेचा संघ

चमारी अथापथु (कर्णधार), हसीनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कवीशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कौशानी नुथ्यंगना, ओशादी रणसिंघे, मालशा शेहानी, मदुशिका मेथथानंद, इनोका रणवीरा, रश्मि सिल्वा, सुगंधिका कुमारी, अचनी कुलाहारिका सेवंडी

मलेशियाचा संघ

विनिफ्रेड दुरईसिंगम (कर्णधार), मास एलिसा (उप-कर्णधार), साशा आज़मी, ऐसा एलीसा, आइना हमीज़ा हाशिम, एल्सा हंटर, जमहीदया इंतान, माहिरा इज्जती इस्माइल, वान जूलिया (विकेटकीपर), धनुसरी मुहुनन, आइना नजवा (विकेटकीपर), नुरिल्या नतास्या, नूर अरियाना नात्स्या, नूर दनिया स्यूहादा, नूर हयाती जकारिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com