FC Goaचा तळावलीवर तीन गोल करत विजय

शिरवडेचा कॉम्पॅशन एफसी संघावर एकतर्फी विजयात तितलीने केले तब्बल सात गोल.
FC Goaचा तळावलीवर तीन गोल करत विजय
GFA Womens Football League स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खेळाडूंसमवेत मान्यवर.Dainik Gomantak

पणजी: संघातील नवी खेळाडू तितली सरकार हिच्या धडाकेबाज खेळाच्या बळावर गतविजेत्या शिरवडे स्पोर्टस क्लबने गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) वेदांता महिला लीग फुटबॉल (Womens Football League) स्पर्धेत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी कॉम्पॅशन एफसी संघाचा १० - ० फरकाने धुव्वा उडविला. स्पर्धेतील आणखी एका सामन्यात गुरुवारी गतउपविजेत्या एफसी गोवा (FC Goa) संघाने युनायटेड क्लब तळावली संघाला ३-० फरकाने हरविले.

GFA Womens Football League स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खेळाडूंसमवेत मान्यवर.
विराट कोहलीने केले FC Goa चे अभिनंदन

धर्मापूर येथील मैदानावर शिरवडेच्या एकतर्फी विजयात तितली हिने एकूण सात गोल केले. याशिवाय व्हिनोष्का फर्नांडिसने दोन, तर रवीना हिने एक गोल केला. नावेली येथील मैदानावर युनायटेड क्लबविरुद्ध एफसी गोवाने तिन्ही गोल उत्तरार्धातील खेळात नोंदविले. वालंका डिसोझा हिने ५२व्या मिनिटास पहिला गोल केला. नंतर व्हेलानी फर्नांडिस हिने अनुक्रमे ६९ व ७९व्या मिनिटास गोल करून एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

GFA Womens Football League स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खेळाडूंसमवेत मान्यवर.
भारतीय संघाची स्तुती करताना लतीफ ने पाकिस्तानी निवडकर्त्यांना सुनावले

स्पर्धेचे उदघाटन एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डेरिक परेरा, जीएफए उपाध्यक्ष अँथनी पांगो, जीएफए महिला समितीच्या अध्यक्ष कॅरोल फर्नांडिस, उपाध्यक्ष आर्नोल्ड कॉस्ता, सेझा फुटबॉल अकादमीचे मेलरॉय मौरा यांच्या उपस्थितीत झाले.

Related Stories

No stories found.