क्रिकेट संघाचा अजब विजय; 4 चेंडूत गाठले लक्ष्य 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

क्रिकेट या खेळाला एक अनिश्चित खेळ म्हणतात त्यात काही चूक नाही. अगदी पुढच्या बॉल वर काय होईल ते सांगता येत नाही. येणाऱ्या बॉल वर एखादा फटका लागेल कि खेळाडू बाद होऊन परत जाईल हे सांगणे कठीण असते. याशिवाय क्रिकेट मध्ये प्रत्येक दिवसाला नवे रेकॉर्ड बनवले जातात आणि त्यामुळे जुने रेकॉर्ड नाहीसे होत असतात.

नवी दिल्ली: क्रिकेट या खेळाला एक अनिश्चित खेळ म्हणतात त्यात काही चूक नाही. अगदी पुढच्या बॉल वर काय होईल ते सांगता येत नाही. येणाऱ्या बॉल वर एखादा फटका लागेल कि खेळाडू बाद होऊन परत जाईल हे सांगणे कठीण असते. याशिवाय क्रिकेट मध्ये प्रत्येक दिवसाला नवे रेकॉर्ड बनवले जातात आणि त्यामुळे जुने रेकॉर्ड नाहीसे होत असतात. परंतु एकेकदा असे काही रेकॉर्ड बनवले जातात कि त्यांच्यावर डोळ्यांनी बघून सुद्धा विश्वास ठेवणे फार कठीण होऊन जाते. असाच एक रंगतदार सामना झाला आहे मुंबई आणि नागालँडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये. सीनियर वनडे ट्रॉफी मध्ये मुंबईच्या महिला संघाने नागालँडच्या महिला क्रिकेट संघाला केवळ 17 धावांमध्ये ऑलआऊट करून सोडले. आणि त्यानंतर 18 धावांचे दिलेले लक्ष्य केवळ 4 चेंडू मधेच पूर्ण करून सामना संपवून टाकला. (In the womens ODI Mumbai beat Nagaland by ten wickets)

इंग्लंडच्या विजयानंतर मायकल वॉनचे भाकित

वुमेन्स सीनियर वनडे ट्रॉफी साठी (Mumbai and Nagaland womens Match) मुंबई आणि नागालँडचा महिला संघ मैदानावर एकमेकांच्या आमनेसामने आला होता. आणि नागालँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय सपेशल फसल्याचे पाहायला मिळाले. कारण मुंबई संघातील सायली सतघरे हिच्या धमाकेदार  गोलंदाजीसमोर नागालँडचे फलंदाज एक एक करून माघारी परतत होते. आणि नागालँडचा संघ केवळ 17 धावांवरच पूर्णपणे सर्वबाद झाला. नागालँड संघासाठी सरीबाने सर्वात अधिक 9 धावा काढल्या. तर सायलीने आपल्या गोलंदाजीचा कहर दाखवत 8.4 ओव्हर मध्ये केवळ 7 रन दिले आणि संपूर्ण मॅच मध्ये 5 खेळाडू आउट करत चकित करून सोडणारी कामगिरी केली.  

यानंतर, (In the womens ODI Mumbai beat Nagaland by ten wickets) केवळ 18 धावांचे लक्ष पूर्ण करण्यास मैदानात उतरलेला मुंबई संघ केवळ 4 बॉल मधेच खेळाचा निकाल लावून रिकामा झाला. संघाचे सलामीवीर ईशा ओजा आणि वृषाली भगत यांनी केवळ चार चेंडूंमध्ये 296 चेंडू शिल्लक असताना संघाला त्वरित विजय मिळवून दिला. दोघांनीही तीन चौकार आणि एक षटकारासह 18 धावा अत्यंत सहजतेने पूर्ण केल्या. नागालँड संघात खाते न उघडता सहा फलंदाज आऊट झाले. सामन्यादरम्यान, संघातील कोणताही फलंदाज दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचू शकला नाही.

संबंधित बातम्या