WPL 2023: नंबर वनसाठी आज रंगणार चूरस! कोणाला आहे पहिला फायनलिस्ट बनण्याची संधी, घ्या जाणून

वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत आज पहिला फायनलिस्ट संघ मिळणार आहे, त्यासाठी काय समीकरणे आहेत, जाणून घ्या.
WPL 2023
WPL 2023Dainik Gomantak

Women's Premier League 2023: मंगळवारी (21 मार्च) म्हणजेच आज वूमन्स प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत अखेरचे साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. या दिवसातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होईल, तर दुसरा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे.

बेंगलोर विरुद्ध मुंबई संघातील सामन्याला दुपारी 3.30 वाजता आणि युपी विरुद्ध दिल्ली संघातील सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.

या सामन्यांनंतर कोणता संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश करणार हे निश्चित होईल. कारण डब्ल्यूपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेत अव्वल तीन क्रमांकावर राहाणारे संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार असले, तरी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरील संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे.

तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ एलिमिनेटरचा सामना खेळले. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

WPL 2023
MUM vs DEL, WPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने उडवला मुंबई इंडियन्सचा धुव्वा, 9 षटकात केल्या 110 धावा

डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या तिन्ही संघांनी यापूर्वीच प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. मात्र आता तिन्ही संघात अव्वल क्रमांकासाठी शर्यत आहे.

सध्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे 7 सामन्यांतील 5 विजयांसह 10 गुण आहेत. पण नेट रनरेटनुसार दिल्ली अव्वल क्रमांकावर आहे, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच युपीने 7 सामन्यांतील 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

असे आहे समीकरण

मुंबई इंडियन्सला अव्वल क्रमांकावर राहून अंतिम सामना खेळायचा असेल, तर त्यांना आज बेंगलोरला पराभूत करावे लागेल. तसेच त्यांना ही देखील अपेक्षा करावी लागेल की युपी वॉरियर्स दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करेल. जर असे झाले, तर मुंबई इंडियन्स थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

तसेच जर आज होणारा सामना मुंबई इंडियन्सने पराभूत झाला, तर दिल्ली कॅपिटल्सच्या अव्वल स्थान कायम राखण्याच्या आशा प्रबळ होतील. कारण दिल्लीचा रनरेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुंबईच्या पराभवानंतर जरी ते आज युपीविरुद्ध पराभूत झाले, तरी जास्तीच्या रनरेटच्या आधारे ते अंतिम सामना गाठू शकतात. पण दिल्लीला युपीविरुद्ध मोठा पराभव स्विकारूनही चालणार नाही.

WPL 2023
WPL 2023: 'चुकीचा अर्थ लावला आणि...', गुजरात जायंट्सने बाहेर केलेल्या डॉटीनच्या दाव्याने नवा गोंधळ

याबरोबरच मुंबई इंडियन्स जर पराभूत झाले आणि दिल्लीने विजय मिळवला, तर दिल्ली थेट अंतिम सामन्यात जाईल. त्याचबरोबर जर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ आज विजयी झाले, तरी नेट रनरेटच्या आधारे गुणतालिकेतील अव्वल स्थान निश्चित होईल.

तसेच जर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आज पराभूत झाले, तर मुंबई, दिल्ली आणि युपी हे तिन्ही संघ 10 गुणांवर राहतील. अशा परिस्थितीतही नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे.

त्यामुळे आज होणारे सामने अव्वल स्थान तर निश्चित करतीलच, पण अंतिम सामन्यात जाणारा पहिला संघही निश्चित होईल.

डब्लूपीएलमधील एलिमिनेटरचा सामना 24 फेब्रुवारीला आणि अंतिम सामना 26 फेब्रुवारीला खेळवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com