WPL 2023: दोन संघ प्लेऑफला पात्र, तर तिसऱ्या जागेसाठी चूरस, असे आहे संपूर्ण समीकरण

पाच संघात खेळवण्यात येणाऱ्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेतील पहिले तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहेत.
WPL 2023
WPL 2023Dainik Gomantak

Women's Premier League 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून रोमांचक वळणावर आली आहे. या स्पर्धेत शनिवारपर्यंत 16 सामने झाले आहेत. पाच संघात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत गुणतालिकेतील पहिले तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान या 16 सामन्यांनंतर पहिल्या क्रमांकावर 6 सामन्यात 5 विजय मिळवून 10 गुणांसह मुंबई इंडियन्स अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 6 सामन्यांत 4 विजय मिळवून 8 गुणांसह दिल्ली कॅपिटल्स आहेत. हे दोन्ही संघांनी प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे.

WPL 2023
RCB Vs GG, WPL 2023: स्मृतीची RCB दुसऱ्यांदा जिंकली, गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव

मात्र आता प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरण्यासाठी गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स यांच्यात चूरस आहे. सध्याच्या गुणतालिकेप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर 6 सामन्यांतील 3 विजय मिळवून 6 गुणांसह युपी वॉरियर्स आहे. तर बेंगलोर आणि गुजरात यांनी प्रत्येकी 7 सामने खेळले असून 2 विजय मिळवले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

त्यामुळे आता या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण त्यातही युपी वॉरियर्सचा मार्ग सर्वात सोपा आहे. कारण त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत आणि त्यांनी यातील एक जरी सामना जिंकला तरी युपी वॉरियर्स प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. याबरोबर गुजरात आणि बेंगलोरचे आव्हानही संपेल.

पण, जर युपी वॉरियर्स पुढील दोन्ही सामने पराभूत झाले आणि गुजरात आणि बेंगलोर यांनी त्यांचा उर्वरित सामना जिंकला, तर त्यांचेही गुण 6 होतील. अशात नेट रनरेटनुसार प्लेऑफमध्ये जाणारा तिसरा संघ निश्चित होईल.

WPL 2023
WPL 2023: 'चिकनी चमेली'वर जेमिमाह रोड्रिग्जसह थिरकले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू, Video Viral

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की उर्वरित सामन्यांमध्ये 17 वा सामना 20 मार्चला युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. त्यामुळ जर हा सामना युपीने जिंकला, तर मात्र गुजरात आणि बेंगलोर या दोन्ही संघाचे आव्हान संपेल.

पण जर गुजरातने विजय मिळवला, तर तिन्ही संघांचे आव्हान कायम राहिल. आता प्लेऑफमध्ये जाणारा तिसरा संघाचा मान कोण मिळवणार हे पाहावे लागणार आहे.

असे खेळवले जाणार प्लेऑफ

महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याबरोबरच अव्वल क्रमांक मिळवण्यासाठीही संघांमध्ये चूरस असेल.

तसेच गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारे संघ एलिमिनेटरचा सामना खेळतील. या सामन्यात विजय मिळवणारे संघ अंतिम सामना खेळणार खेळेल. एलिमिनेटरचा सामना 24 मार्चला पार पडणार आहे, तसेच अंतिम सामना 26 मार्चला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com