India vs Pakistan: पाकिस्तानला आस्मान दाखवणाऱ्या भारताच्या जेमिमाह-ऋचाची फटकेबाजी पाहिली का?

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध जेमिमाह-ऋचाने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने सहज विजय मिळवला.
Jemimah Rodrigues | Richa Ghosh | India Women vs Pakistan Women
Jemimah Rodrigues | Richa Ghosh | India Women vs Pakistan WomenDainik Gomantak

Women's T20 World Cup: महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय महिला संघाने रविवारी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना होता. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या वर्ल्डकप मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे.

भारताच्या विजयात मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रोड्रिग्ज आणि यष्टीरक्षक ऋचा घोषने महत्त्वाची कामगिरी बजावली. पाकिस्तानने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या दोघींनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 58 धावांची भागीदारी केली.

भारताने 14 व्या षटकात 93 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर जेमिमाह आणि ऋचा यांनी पाकिस्तानला यश मिळू दिले नाही. या दोघींनीही एकमेकींना चांगली साथ दिली. या दोघींनी मिळून 17, 18 आणि 19 या तीन षटकात मिळून 42 धावा काढल्या.

या तीन षटकात जेमिमाह आणि ऋचा या दोघींनीही प्रत्येकी 4 षटकार ठोकले. त्यांच्या या फटकेबाजीमुळे भारताने एक षटक आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

जेमिमाहने या सामन्यात 38 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत जेमिमाहने 8 चौकार मारले. तसेच ऋचाने 20 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी करताना 5 चौकार ठोकले. या दोघींच्या फटकेबाजीचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारताकडून जेमिमाह आणि ऋचा व्यतिरिक्त शफाली वर्माने 25 चेंडूत 33 धावांची खेळी केली. तसेच यास्तिका भाटियाने 17 आणि हरमनप्रीत कौरने 16 धावांची खेळी केली.

दरम्यान, पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 149 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारुफने सर्वाधिक नाबाद 68 धावांची खेळी केली.

तसेच तिला 18 वर्षीय आयेशा नसिमने चांगली साथ देताना नाबाद 43 धावा केल्या. या दोघींमध्ये ५ व्या विकेटसाठी नाबाद 81 धावांची भागीदारी झाली. भारताकडून राधा यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com