विश्वचषकाच्या तब्बल 15 महिन्यानंतर महिला संघाला मिळाली बक्षीसाची रक्कम

दैनिक गोमंतक
सोमवार, 7 जून 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्यावतीने स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभरात ही रक्कम बीसीसीआयकडे पाठवण्यात आली होती, जेणेकरून ती खेळाडूंना देण्यात येईल.

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिला टी -20 विश्वचषकाच्या (Women's t20 World Cup) 15 महिन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंना बक्षिसाची रक्कम (Prize Money) दिली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेते ठरला होता. बीसीसीआयने महिला संघाला साडेतीन कोटी रुपये दिल्याची माहिती दिली आहे. 

माध्यमांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी -20 विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने उपविजेत्या संघाला साडेतीन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्यावतीने स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभरात ही रक्कम बीसीसीआयकडे पाठवण्यात आली होती, जेणेकरून ती खेळाडूंना देण्यात येईल. परंतु, बीसीसीआयने ही रक्कम स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वितरित केली नाही.अशी माहिती यूकेच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. 

भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुष संघ देणार धडे

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. महिला संघ इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी- 20  सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या संघ ब्रिस्टलमध्ये विलगीकरणात आहे. 

संबंधित बातम्या