World Cup 2023: ‘ही’ टीम जिंकणार 2023 चा वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची भविष्यवाणी

World Cup 2023: 2023 च्या विश्वचषकाचे आयोजन यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात केले जाणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

World Cup 2023: 2023 च्या विश्वचषकाचे आयोजन यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात केले जाणार आहे, परंतु त्याआधी आयसीसीच्या या मेगा स्पर्धेच्या विजेत्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून 7 महिने बाकी आहेत, पण यावर्षी 2023 ची विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या नावाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे.

हा संघ 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकेल

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने यावेळी 2023 च्या विश्वचषकाची ट्रॉफी कोणती संघ उचलणार याची मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रेट लीने स्पोर्ट्स यारीशी साधलेल्या संवादात यावर्षी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे.

ब्रेट ली म्हणाला की, 'भारत (India) 2023 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करणे कठीण होईल. भारताला भारतीय परिस्थितीबद्दल सर्वात जास्त आणि चांगले माहिती आहे, त्यामुळे मला वाटते की भारत 2023 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.

Team India
ICC ने T20 World Cup 2023 चा संघ केला जाहीर, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला मिळाले स्थान

मोठी भविष्यवाणी आधीच झाली आहे

याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही 7 जूनपासून होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.

Team India
World Cup 2023 साठी अफगाणिस्तान पात्र, भारतात खेळवली जाणार ICC स्पर्धा

तसेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे जेतेपद कोणता संघ जिंकेल याविषयी ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणाला की, 'ऑस्ट्रेलिया जिंकेल.'

ब्रेट ली पुढे म्हणाला की, 'भारत हा एक चांगला संघ आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे आणि मला वाटते की तिथली परिस्थिती ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असेल, त्यामुळे माझे हे मत आहे. ऑस्ट्रेलिया.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com