World Cup: वर्ल्ड कप-2023 मधील खर्चावर नजर ठेवणार, दिल्ली HC चा मोठा निर्णय

ISSF Shooting World Cup: दिल्ली उच्च न्यायालयाने आगामी शूटिंग वर्ल्ड कप संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Delhi High Court
Delhi High CourtDainik Gomantak

ISSF Shooting World Cup: दिल्ली उच्च न्यायालयाने आगामी शूटिंग वर्ल्ड कप संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी मार्चमध्ये आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपसाठी पैशाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एके सिक्री यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरएआय) कडे निधी देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

उच्च न्यायालयाने निर्देश दिले

NRAI च्या जून 2022 च्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) सुनावणी सुरु होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन न करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) कोणताही निधी किंवा मदत दिली जाणार नाही, असे निर्देश दिले. NRAI ने मार्च 2023 मध्ये होणाऱ्या नेमबाजी विश्वचषकाचा दाखला देत निधी देण्याची मागणी केली होती.

Delhi High Court
Hockey World Cup 2023 मध्ये भारताचा दुसरा विजय, वेल्सचा दारुण पराभव

'केंद्राकडून पैसे हवेत'

या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने म्हटले की, 'शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास त्याचा देशाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) निधी लागणार आहे.'

Delhi High Court
U19 Women's T20 World Cup: भारतीय महिलांकडून स्कॉटलंडचा धुव्वा! सुपर सिक्समध्येही दिमाखात एन्ट्री

कोणत्याही शूटरची मदत घेऊ शकतात

न्यायालयाने म्हटले की, "सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायमूर्ती (निवृत्त) अर्जन कुमार सिक्री यांची मार्च 2023 मध्ये होणाऱ्या शूटिंग वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी निधीच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे." ते त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असलेल्या कोणत्याही खेळाडूची मदत घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com