T20 World Cup: 'संघ निवडीत माझा अन् कोहलीचा समावेश नव्हता'

कर्णधार विराट कोहलीचीही (Virat Kohli) संमती संघ निवडीमध्ये घेण्यात आली नसल्याची माहिती शास्त्रींनी माध्यमाशी बोलताना दिली.
T20 World Cup: 'संघ निवडीत माझा अन् कोहलीचा समावेश नव्हता'
Ravi ShastriDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी राजीनामा दिला आहे. 2021 च्या T20 विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेत भारत सुपर-12 मधून बाहेर पडताच त्यांचा कार्यकाळ संपला आहे. टीम इंडियाचे (Indian Cricket Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा कार्यकाळ या वर्ल्ड कपपर्यंतच होता. पद सोडताच रवी शास्त्रींनी मोठा खुलासा केला आहे. 'T20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात आपली भूमिका नव्हती, असं ते यावेळी म्हणाले. यासोबतच कर्णधार विराट कोहलीचीही (Virat Kohli) संमती संघ निवडीमध्ये घेण्यात आली नसल्याची माहिती शास्त्रींनी माध्यमाशी बोलताना दिली.

दरम्यान, माध्यमाशी साधलेल्या संवादादरम्यान ते म्हणाले, 'माझा संघ निवडीत कोणताही सहभाग नव्हता. प्लेइंग इलेव्हन निवडण्यात तेवढा सहभाग होता. (T20 World Cup 2021) 15 सदस्यीय निवड समितीने हा संघ निवडला होता. तसेच या संघ निवडीत कर्णधार विराट कोहलीचाही सहभाग नव्हता' रवी शास्त्री यांनी टी-20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळापत्रकावरही यावेळी प्रश्न उपस्थित केले.

Ravi Shastri
पाकिस्तानच्या पराभवानंतर सानिया मिर्झा का होत आहे ट्रोल?

ड्रेसिंग रुममधील दादागिरीबद्दल शास्त्री म्हणाले

ड्रेसिंग रुममधील विराट कोहलीच्या दादागिरी करण्याच्या आरोपांवर रवी शास्त्री यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'मी अशा गोष्टी वाचत नाही. ड्रेसिंग रुममध्ये काय चाललेले याची पूर्ण माहिती असते. त्यामुळे शेवटी, लोक लिहू शकतात पण संघ स्कोअरबोर्डवर काय लिहितो ते लोकांना आठवते. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियामध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही येत होत्या. कर्णधाराच्या वागणुकीमुळे काही वरिष्ठ खेळाडू संतापले असल्याचे सांगण्यात आले. त्यासंबंधीची तक्रारही बीसीसीआयकडे करण्यात आली होती.'

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com