England Won T-20 World Cup
England Won T-20 World CupDainik Gomantak

England Won T-20 World Cup: वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडला बक्षीस म्हणून मिळणार इतके कोटी रूपये

उपविजेत्या पाकिस्तानलाही मिळणार घसघशीत रक्कम; सॅम करन ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट

England Won T-20 World Cup: पाकिस्तानला नमवून इंग्लंडने टी-20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन या स्पर्धेत मालिकावीर ठरला आहे. दरम्यान, या विजेतेपदासाठी इंग्लंडला आयसीसीकडुन मोठी रक्कम मिळाली आहे. तसेच पाकिस्तानलाही उपविजेतेपदाबद्दल घसघशीत रक्कम मिळाली आहे.

England Won T-20 World Cup
England Won T-20 WC: पाकिस्तानला हरवून इंग्लड विश्वविजेता; स्टोक्सचा पाकिस्तानला 'शॉक'

सॅम करन याने या स्पर्धेत 11.38 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर विजेत्या इंग्लंड संघाला 1.6 मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. म्हणजे सुमारे 13 कोटी 4 लाख रूपये. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानला उपविजेतेपदासाठीचे म्हणून सुमारे 6 कोटी रुपये मिळणार आहेत.

टीम इंडियाला (Team India) सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता, पण सेमीफायनल मॅच हरणाऱ्या टीमला ICC कडून सुमारे 3 कोटी रूपये मिळणार आहेत. भारतासोबतच पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या न्यूझीलंडलाही एवढीच रक्कम मिळणार आहे.

England Won T-20 World Cup
England Won T-20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाची 5 कारणे... वाचा सविस्तर

इंग्लंडने घेतला 30 वर्षांपुर्वीचा बदला

1992 एकदिवस क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. त्या पराभवाचा बदला या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करून घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com