जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका: इंडिया लिजंड्सची श्रीलंका लिजंड्सवर मात

जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका: इंडिया लिजंड्सची श्रीलंका लिजंड्सवर मात
World Road Safety Cricket Series India Lings beat Sri Lanka Lings

रायपूर: (World Road Safety Cricket Series India Lings beat Sri Lanka Lings) युवराज सिंग आणि युसुफ पठाण यांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी आणि पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सचा 14 धावांनी पराभव करुन जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केले आहे.

युसुफ पठाण नाबाद 62 धावा तसेच युवराजच्या 60 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकात 4 बाद 181 धावा उभारल्या. त्यानंतर इरफान आणि युसुफ या पठाण बंधूंनी श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. कौशल विररत्ने 38 धावा, सनथ जयसूर्या 43 धावा, चिंतक जयसिंघे 40 धावा यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला  7 बाद 167 धावा करता आल्या. (World Road Safety Cricket Series India Lings beat Sri Lanka Lings)

इंडिया लिजंड्स: 20 षटकांत 4 बाद 181 युसुफ पठाण 62, युवराज 60 रंगना हेराथ 1/ 11 विजयी वि. श्रीलंका: 20  षटकात 7 बाद 167 चिंतक जयसिंघे 40 सनथ जयसूर्या 43 युसुफ पठाण 2/26  इरफान पठाण  2/29
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com