
UP Warriorz vs Mumbai Indians: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 10 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात ब्रेबॉर्न स्टेडियवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. मुंबईच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौरचे योगदान महत्त्वाचे ठरले.
या सामन्यात युपीने मुंबईसमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 17.3 षटकातच 2 विकेट्स गमावत 164 धावा करत पूर्ण केला. यासह मुंबईने हा सामना सहज जिंकला. हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात मुंबईकडून सलामीला खेळायला आलेल्या यास्तिका भाटीयाने दमदार सुरुवात दिली होती. तिला हेली मॅथ्यूजने चांगली साथ दिली होती. या दोघींनी सलामीला 58 धावांची भागीदारीही रचली.
मात्र या दोघीपण लागोपाठच्या षटकात बाद झाल्या. यास्तिकाला सातव्या षटकात राजेश्वरी गायकवाडने बाद केले. यास्तिकाने 27 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 42 धावांची खेळी केली. तर मॅथ्यूजला सोफी एक्लेस्टोनने १२ धावांवर आठव्या षटकात बाद केले.
पण, त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि नतालिया स्किव्हर यांनी युपीच्या गोलंदाजांची लय बिघडवली. त्याने विजय जसजसा नजरेस पडू लागला, तसे आक्रमक फटकेही मारणे सुरू केले. या दोघींनीही तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 106 धावांची भागीदारी केली आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हरमनप्रीतने 33 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 53 धावांची खेळी केली. तसेच नतालिया स्किव्हरने 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 45 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण युपीने देविका वैद्यची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली होती. मात्र त्यानंतर कर्णधार एलिसा हेलीची चांगली साथ देण्याचा किरण नवगिरेने प्रयत्न केला. पण किरणलाही 17 धावांवर एमिलिया केरने बाद केले.
मात्र, त्यानंतर हेली आणि ताहलिया मॅकग्रा यांची जोडी जमली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र या दोघींनाही 17 व्या षटकात सायका ईशाकने बाद करत युपीला दुहेरी धक्का दिला. पण, बाद होण्यापूर्वी दोघींनीही अर्धशतके केली होती. हेलीने 46 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच मॅकग्राने 37 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
या दोघींनंतर सोफी इक्लेस्टोन आणि दीप्ती शर्माने स्वस्तात विकेट गमावल्या. पण अखेर सिमरन शेख आणि श्वेता सेहरावत यांनी युपीला 20 षटकांत 6 बाद 159 धावांपर्यंत पोहचवले.
मुंबईकडून सायका ईशाकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर एमिलिया केरने 2 विकेट्स आणि हेली मॅथ्यूजने 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.