UPW vs GG: 7 फोर अन् 3 सिक्ससह गुजरातच्या तोंडून विजयाचा घास हिरावणारी हॅरिस म्हणतेय, 'मला माहित होतं...'

WPL 2023: ग्रेस हॅरिसने अखेरच्या तीन षटकात युपी वॉरियर्सला 53 धावांची गरज असताना ताबडतोड फलंदाजी करत गुजरात जायंट्सविरुद्ध विजय मिळवून दिला.
Grace Harris
Grace HarrisDainik Gomantak

Grace Harris: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा तिसरा सामना रविवारी (5 मार्च) युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात अखेरच्या षटकात युपी वॉरियर्सने 3 विकेट्सने विजय मिळवला. 29 वर्षीय ग्रेस हॅरिस युपीच्या विजयाची शिल्पकार ठरली.

या सामन्यात अखेरच्या 3 षटकांमध्ये युपीला विजयासाठी 53 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत ग्रेसने जबाबदारी हाती घेतली आणि आक्रमक खेळ सुरू केला. तिला सोफी एक्लेस्टोनची चांगली साथ मिळाली. ग्रेसने चौकार-षटकारांची बरसात करताना एक चेंडू राखून युपीला विजय मिळवून दिला.

Grace Harris
'IPL असो किंवा WPL, RCB जैसे थे!', DC विरुद्ध बॉलर्सने 223 धावा दिल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, सामन्यानंतर तिच्या फलंदाजीबद्दल विचारले असता ती म्हणाली, 'माझ्या खेळीची खराब सुरुवात झाली होती. तुम्हाला कसे खेळायचे आहे, हे ठरवण्यासाठी आधी परिस्थितीत समजून घ्यावी लागले. सोफी माझ्याबरोबर टिकून राहिली हे चांगले होते. सामना संपवण्याची भावना छान आहे.'

'मला खरंतर माहित होते की मला काय करायचे आहे. पण अखेरच्या क्षणी अनेक डीआरएस ब्रेक आल्याने मी नर्व्हस झाले होते. मी फलंदाजी करण्यासाठी खूप उत्सुक होते. पण मी खूप ट्रेनिंग केली आहे. मला थोड्या खुलेपणाने फलंदाजी करायला आवडते आणि कर्णधार एलिसा हेली आणि प्रशिक्षकांनी माझ्या निर्णयांना पाठिंबा दिला. सोफी एक क्लिन स्ट्रायकर आहे. मला मजा आली.'

Grace Harris
WPL 2023: फक्त दिल्लीलाच 5, पण बाकी टीमला केवळ 4 परदेशी खेळाडूंची परवानगी का? नक्की काय आहे नियम

ग्रेसने या सामन्यात 26 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. तिने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच तिने सोफीबरोबर 8 व्या विकेटसाठी 26 चेंडूत नाबाद 70 धावांची भागीदारी केली. सोफीने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावांची नाबाद खेळी केली. युपीकडून किरण नवगिरेनेही 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात ग्रेसला तिच्या शानदार फलंदाजीसाठी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला. तिच्या आणि सोफीच्या नाबाद भागिदारीमुळे गुजरातने दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग युपीने 19.5 षटकात 7 विकेट्सने विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com