कोरोनाच्या धास्तीमुळे कुस्तीपटू विनेशचा शिबिरास नकार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय शिबिराच्यावेळी बाहेर जाण्यास मनाई असेल. त्यामुळे मी शिबिरात काहीही खात नाही, असे विनेशने सांगितले.

नवी दिल्ली: टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळवलेल्या विनेश फोगटने कोरोनाच्या धास्तीमुळे राष्ट्रीय शिबिरात सहभागी न होण्याचे ठरवले आहे. ऑलिंपिकला पात्र ठरू शकतील या कुस्तीगीरांचे पूर्वतयारी शिबिर १ सप्टेंबरपासून होणार आहे. राष्ट्रीय शिबिर लखनौत होणार आहे. 

सध्याच्या परिस्थितीत प्रवास करण्यास मी तयार नाही. वैयक्तिक मार्गदर्शक वोल्लर ॲकोस यांच्या सूचनांनुसार ओम प्रकाश माझा सराव करून घेत आहेत. मला कोणत्याही गोष्टीची लागण चटकन होते आणि मी लगेच आजारी पडते, असे विनेशने सांगितले. राष्ट्रीय शिबिराच्यावेळी बाहेर जाण्यास मनाई असेल. त्यामुळे मी शिबिरात काहीही खात नाही, असे विनेशने सांगितले.  शिबिरात सहभागी होत नसल्याबद्दल विनेशवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे, असे संकेत भारतीय कुस्ती महासंघाने 
दिले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या