Travis Head Century: भारताविरुद्ध हेडचा शतकी धमाका! या विश्वविक्रमासह WTC इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले नाव

कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने भारताविरुद्ध केलेले शतक ऐतिहासिक ठरले आहे.
Travis Head
Travis HeadDainik Gomantak

WTC 2023 Final, Travis Head Century: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज ट्रेविस हेडने शतकी खेळी करत इतिहास रचला आहे.

ट्रेविस हेड या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर 156 चेंडूत १४६ धावा करून नाबाद आहे. त्याने या खेळीत पहिल्या दिवशी 22 चौकार आणि 1 षटकार खेचला. त्यामुळे तो कसोटी चॅम्पियनशीपच्या इतिहासात अंतिम सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Travis Head
Weather Report: पावसामुळे राखीव दिवशी खेळ? WTC Final ड्रॉ किंवा टाय झाली, तर विजेता कोण, जाणून घ्या

या सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुरुवातीलाच मार्नस लॅब्युशेनने विकेट गमावल्यानंतर हेड ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने यावेळी आक्रमक पवित्रा स्विकारत धावा जमवायला सुरुवात केली.

त्यामुळे त्याने 60 चेंडूतच त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या बाजूने स्टीव्ह स्मिथने चांगली साथ दिली. या दोघांनीही एकमेकांना साथ देत ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला होता. हेडने 106 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले आहे.

दरम्यान, हेड आणि स्मिथ यांच्यात पहिल्या दिवसाखेर चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर हेड व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर नाबाद राहिला.

Travis Head
Rohit Sharma Video: जरा सांभाळून! WTC फायनलला सुरुवात होण्याआधीच रोहितचा पाय अडखळला अन्...

त्याचमुळे आता या सामन्याच्या दुसऱ्यादिवशी सुरुवातीलाच स्मिथला शतकाची आणि हेडला दिडशतकाची संधी असणार आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची विकेट लवकर गमावली होती. त्याला शुन्यावर मोहम्मद सिराजने बाद केले. पण त्यानंतर मार्नस लॅब्युशेन आणि डेव्हिड वॉर्नरने डाव सांभाळला. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघेही बाद झाले. वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावा केल्या. तर लॅब्युशेनने 62 चेंडूत 26 धावा केल्या.

भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com