
Team india: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघातील काही खेळाडूंनी इंग्लंडला पोहोचून सराव सुरु केला आहे.
दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाची नवीन ट्रेनिंग किट शेअर केली आहे. भारतीय संघाचे खेळाडू ही किट घालून सराव करताना दिसत आहेत.
खरे तर, 25 मे रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या सराव सत्राचे काही फोटो ट्विट केले होते. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव-शार्दुल ठाकूर नव्या ट्रेनिंग जर्सीत दिसत आहेत.
यापूर्वी, BCCI ने जाहीर केले होते की, Adidas टीम इंडियाचे नवीन किट प्रायोजक असेल. हा करार 2028 पर्यंत करण्यात आला आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये नवीन जर्सी परिधान करेल.
अलीकडील ट्विटमध्ये, BCCI सचिव जय शाह यांनी खुलासा केला होता की, 'BCCI ने भारतीय संघाचा पुढील किट प्रायोजक म्हणून Adidas सोबत करार केला आहे. क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स वेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.'
BCCI ने आपल्या अधिकृत निवेदनात असेही म्हटले आहे की, 'Adidas नवीन जर्सी, भारतीय पुरुष, महिला क्रिकेट संघ आणि अंडर-19 संघाची किट तयार आणि डिझाइन करेल. यामध्ये संघासह सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी प्रवास आणि प्रशिक्षण किटचाही समावेश असेल.'
रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
स्टँडबाय खेळाडू: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.