WWC 2022: मिताली राज नंतर झुलन गोस्वामीने नावावरती केला नवा विक्रम

आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही झूलनने मोठी कामगिरी केली.
WWC 2022 Jhulan Goswami
WWC 2022 Jhulan GoswamiDainik Gomantak

झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) ही एक महिला क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. आणि यामुळेच ती आता कोणताही सामना खेळते, कोणतीही मालिका खेळते, तिच्या नावावर नक्कीच काहीतरी रेकॉर्ड बनते. आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women's World Cup 2022) च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यातही झूलनने मोठी कामगिरी केली. हा विक्रम करणारी ती पहिली महिला गोलंदाज बनली आहे. म्हणजेच तिच्याआधी कोणत्याही महिला गोलंदाजाने अशी कामगिरी याआधी केलेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झुलनने चेंडू आणि बॅट न उचलता ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम नोंदवला आहे. (WWC 2022 Jhulan Goswami sets new record after Mithali Raj)

WWC 2022 Jhulan Goswami
GPL : धेंपो, वेळसाव क्लबला पूर्ण गुण

आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता रेकॉर्ड आहे, ज्याचा धागा झूलन गोस्वामीने विणला आहे. तर हा विक्रम सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या महिला गोलंदाजाशी संबंधित आहे, अशात झूलन गोस्वामीने एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

झूलनचे 'दुहेरी शतक'

ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणारा सामना हा झूलन गोस्वामीच्या वनडे कारकिर्दीतील 200 वा सामना आहे तर इतके एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. याआधी खेळलेल्या 199 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 21.83 च्या सरासरीने 250 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये 31 धावांत 6 विकेट घेणे ही तीची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यादरम्यान तिने 5 विकेट घेतल्या आहेत.

WWC 2022 Jhulan Goswami
गोव्याच्या जलतरणपटू संजना प्रभुगावकरची भारतीय संघात निवड

मितालीनंतर झूलन ही दुसरी खेळाडू ठरली,

झूलन 200 वा एकदिवसीय सामना खेळणारी पहिली महिला गोलंदाज ठरली, तसेच महिला क्रिकेटच्या इतिहासात इतके एकदिवसीय सामने खेळणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. त्याच्या आधी हे यश झुलनची जवळची मैत्रीण आणि टीम इंडियाची अनुभवी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिच्या नावावरती आहे. तर मितालीने 229 सामने खेळले आहेत.

ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये झुलनच्या झोळीत पडलेली ही तिसरी कामगिरी आहे तर 200 वनडे खेळण्याआधी तिने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही केला आहे. याशिवाय या विश्वचषकात तिने 250 एकदिवसीय विकेट्स घेण्याचे यशही प्राप्त केलं आहे. ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणारा सामना हा झुलन गोस्वामीचा 200 वा एकदिवसीय सामना असणार आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन खेळाडू बेथ मुनीच्या कारकिर्दीतील हा 50 वा एकदिवसीय सामना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com