Jeff Hardy: WWE सुपरस्टार हार्डीला दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक

माजी WWE सुपरस्टार जेफ हार्डीच्या अडचणीत वाढ
Jeff Hardy: WWE सुपरस्टार हार्डीला दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक
WWE Star Jeff Hardy Twitter

माजी WWE सुपरस्टार जेफ हार्डीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत गाडी चालवल्याच्या आरोपाखाली हार्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच हार्डीवर निलंबित किंवा रद्द परवाना घेऊन वाहन चालवण्याचा आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर लावण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. हार्डी 10 वर्षात तिसऱ्यांदा अशा प्रकरणात अडकला आहे. (WWE Star Jeff Hardy)

WWE Star Jeff Hardy
जम्मू-काश्मीरसाठी शिंप्याच्या मुलाने सायकलिंगमध्ये जिंकले पहिले सुवर्ण, वाचा संघर्षाची कहाणी

फ्लोरिडामध्ये अटक

पोलिसांनी सांगितले की, जेफ हार्डी त्याच्या पायावर नीट उभे राहण्याच्या स्थितीतही नव्हता. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. हार्डीच्या दोन वेगवेगळ्या श्वासांचे नमुने अनुक्रमे .294 आणि .291 नोंदवले गेले. फ्लोरिडामध्ये कायदेशीर मर्यादा .08 आहे. हार्डी सध्या कोठडीत असून त्याला आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे.

WWE Star Jeff Hardy
VVS लक्ष्मण होणार आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

सहा वेळा विश्वविजेता

हार्डीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये उत्कृष्ट कारकीर्द केली आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्याला दोनदा 'मोस्ट पॉप्युलर रेसलर ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले. हार्डी सध्या ऑल एलिट रेसलिंग (AEW) मध्ये भाग घेतो. गेल्या दशकभरात हार्दिकला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आहे. बंदी घातलेल्या औषधांच्या तस्करीशी संबंधित आरोपांसाठी त्याला 2011 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2017 मध्ये हार्डीने WWEमध्ये पुनरागमन केले, परंतु नंतर त्याला बाहेर काढण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com