WWE Star Khali: 'द ग्रेट खली' टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांशी भिडला, Video Viral

माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे WWE चॅम्पियन 'द ग्रेट खली' दलीप सिंग राणा वादात सापडला आहे.
WWE Star Khali
WWE Star KhaliTwitter

माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे WWE चॅम्पियन 'द ग्रेट खली' (WWE Star Khali) दलीप सिंग राणा वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो टोल प्लाझाच्या लोकांशी भांडताना दिसत आहे. एवढेच नाही तर खलीवर टोल प्लाझाच्या व्यक्तीला हानामारी केल्याचाही आरोप आहे.

खलीला टोल प्लाझाच्या अधिकाऱ्याने ओळखपत्र मागितले म्हणून हा वाद निर्माण झाला असे व्हिडिओमध्ये दाखवले जात आहे. त्याचवेळी एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने कारमध्ये घुसत होता, त्यामुळे ही घटना घडली असे स्पष्टिकरण खलीने दिले. व्हिडिओमध्ये खली कर्मचाऱ्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करताना दिसत आहे.

WWE Star Khali
Commonwealth Games 2022: हरमनप्रीत कौर बर्मिंगहॅममध्ये करणार भारतीय महिला संघाचे नेतृत्व

खली जालंधरहून कर्नालला जात असतानाची ही घटना आहे. हा व्हिडिओ फिल्लोरजवळील टोल प्लाझाचा आहे. एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये शिरला होता. नकार दिल्याने हा वाद झाला. यानंतर बाकीचे कर्मचारी आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

यानंतर खली आपल्या कारमधून बाहेर आला आणि त्याने बॅरीयर काढून कार बाहेर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका कर्मचाऱ्याने खलीला रोखण्यास सुरुवात केली. यावर स्टार पैलवानाने त्याला पकडून बाजूला केले. ही घटना व्हिडिओमध्येही कैद झाली आहे. खली एक रेसलर असून तो भारतीय जनता पक्षाचा (BJP) नेता देखील आहे.

WWE Star Khali
IND vs ENG 1st ODI: कोहली बाहेर पडल्यास 'या' खेळाडूला मिळू शकते प्लेइंग 11 मध्ये संधी

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनाही आपली बाजू स्पष्ट केली. आम्ही खलीकडून फक्त ओळखपत्र मागितले. यावर खलीने आम्हाला हाणामारी केली. असे अधिकाऱ्याने सांगितले. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी खलीला माकड म्हणत असल्याचे ऐकू येते आगे. दरम्यान संतप्त कर्मचारी खलीला बाहेर जाऊ देत नव्हते. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com