सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने WWE Wrestler भावनिक

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो (WWE)
सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने WWE Wrestler भावनिक
जॉन सीनाने सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला (WWE)Dainik Gomantak

जॉन सीना (John Cena) हे WWE मधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतो. त्याचे भारतिय लोकांवर खूप प्रेम आहे, हे त्याने बऱ्याच वेळा सोशल मीडिया वरून दाखवून दिले आहे. यावेळी जॉन सीनाने सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली आहे, आणि अर्थातच ती प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shuka Death) विषयीची. सिद्धार्थ शुक्लाचे छायाचित्र जॉन सिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर (John Cena Instagram) पोस्ट केले आहे. जॉन सीनाने यावेळी देखील कोणतेही कॅप्शन दिले नाही, कारण आपल्याला माहीतच असेल, सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. जॉन सीनाने हे चित्र टाकून सिद्धार्थ शुक्लाबद्दल शोक व्यक्त केला.

जॉन सीना नेहमीच काही ना काही पोस्ट सोशल मीडियावर मथळ्याविना अपलोड करतो. जॉन सीनाने भारतातील (India) अनेक सेलिब्रिटींविषयी पोस्ट बऱ्याच वेळा शेअर केलेत. यावेळी सीनाने काय पोस्ट केले हे पाहून चाहते नक्कीच भावुक झाले असतील.

जॉन सीनाने सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला (WWE)
Virat Kohli बनला 150 millions Instagram followers भारतातील पहिला खेळाडू

अनेक अहवालांमध्ये, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका म्हणून देण्यात आले आहे. सिद्धार्थला बालिका वधू या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 13 चा विजेताही बनला, आणि बिग बॉस सीझन 13 मध्ये सिद्धार्थ शुक्ला शोचे सर्वात मोठे आकर्षण ठरला होता आणि तो सर्वांचा आवडता अभिनेता बनला होता. परंतु अचानक झालेल्या त्याच्या मृत्युमुळे जॉन सीना देखील दुःखी दिसत होता.

जॉन सीना वर्षभरानंतर जुलैमध्ये WWE रिंगमध्ये परतला होता. त्यानंतर जॉन सीनाने रोमन रेन्सला युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी आव्हान दिले. WWE Summer Slam 2021 च्या मुख्य शोमध्ये सीना आणि रेंस यांच्यात जबरदस्त सामना झाला. जॉन सीना या सामन्यात हरला आणि रेन्स आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यात यशस्वी झाला. यानंतर मात्र जॉन सीना रिंगमध्ये दिसला नाही. 10 सप्टेंबर रोजी MSG येथे होणाऱ्या Blue Brand च्या भागामध्ये सीना शेवटचा दिसेल, कारण तो कदाचित त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाईल. मात्र सीना पुढच्या वेळी कधी परतणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com