IPL 2021 Auction : 'हा' खेळाडू ठरला महागडा; तर अनकॅप खेळाडूंमध्ये याने मारली बाजी  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2021 मध्ये होणाऱ्या 14 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नईत सुरू आहे. 

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2021 मध्ये होणाऱ्या 14 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नईत सुरू आहे. आणि या लिलासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 292 खेळाडूंची निवड केली होती, परंतु लिलावापूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने आपले नाव मागे घेतले आहे. व त्यामुळे 291 खेळाडूंवर बोली लावण्यात येत आहे. 

आयपीएल 2021 साठीचा लिलाव सर्वात आधी भारतीय फलंदाज करुण नायरच्या 50 लाखांच्या बेस किंमतीसह सूरू झाला. मात्र कसोटीच्या पहिल्या टप्प्यात तिहेरी शतकी करणाऱ्या या खेळाडूसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. यानंतर इंग्लंडचा विकेटकिपर फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्सलाही कोणत्याही संघाने खरेदी करण्यात रस दाखवला नाही. जेसन रॉय देखील विकला गेला नाही. याशिवाय पहिल्या फेरीत अ‍ॅरॉन आणि हनुमा विहारीवर सुद्धा कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याचबरोबर केदार जाधवला देखील खरेदी करण्यास कोणत्याही संघाने रस दाखविला नाही.

सचिन तेंडुलकरचा मुलगा उतरणार आयपीएलच्या मैदानात; 'या' संघाकडून दिसेल...

याशिवाय, दुसऱ्या फेरीतील तिसर्‍या सेटचे खेळाडू अ‍ॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्ज आणि कुसल परेरा यांना देखील घेण्यात कोणत्याही संघाने उत्सुकता दाखविली नाही. तसेच, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानलाही कोणत्याही संघाने घेतले नाही. यानंतर वेस्ट इंडीज संघाचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेलवर देखील कोणत्याच संघाने बोली लावली नाही. इतकेच नाही तर, मुजीब उल रहमान आणि राहुल शर्मा हेदेखील अनसोल्ड राहिले. याव्यतिरिक्त हरभजन सिंगला देखील पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने घेतले नाही.  

ख्रिस मॉरिस (16.25 कोटी)

अष्टपैलू ख्रिस मॉरिस वर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जच्या संघाने बोली पुढे सुरू ठेवली. दोन कोटींच्या बेस प्राइजसह ख्रिसचा राजस्थान रॉयल्स संघाने अखेर 16.25 कोटींच्या बोलीसह संघात समावेश केला. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2016 मध्ये युवराज सिंगसाठी 16 कोटींची बोली लावली होती. 

शिवम दुबे (4.40 कोटी)

50 लाखांच्या बेस प्राइससह लिलावात उतरलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा समावेश राजस्थान रॉयल्सने 4.40 कोटींच्या बोलीसह त्यांच्या संघात समावेश केला. 

मोईन अली (7 कोटी)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा चेन्नई सुपर किंग्ज संघाने 7 कोटींच्या बोलीसह संघात समावेश केला. पंजाब संघानेही त्यांना खरेदी करण्यात रस दाखविला होता, पण शेवटी चेन्नईने बाजी मारली.

ग्लेन मॅक्सवेल (14.25 कोटी)

दोन कोटींच्या बेस प्राइससह कोलकाताच्या संघाने ऑस्ट्रेलियाकडून या अष्टपैलू खेळाडूसाठी बोली सुरू केली, त्यानंतर राजस्थान संघ पुढे आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानेही मॅक्सवेलमध्ये रस दाखवत ही बोली वाढवून 4.40 कोटींवर आणली. त्यानंतर चेन्नई संघाने बोली लावण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर आरसीबीमध्ये बोली वाढत गेली आणि शेवटी बेंगळुरूच्या संघाने 14.25 कोटींने ही बोली जिंकली व मॅक्सवेलला संघात सामिल केले.

साकिब अल हसन (3.20 कोटी)

बंदीनंतर परतणारा अष्टपैलू शाकिब अल हसन 2 कोटींच्या बेस प्राइससह लिलावात उतरला. कोलकाता नाईट रायडर्सने 3.20 कोटींच्या बोलीसह या खेळाडूस संघात सामिल केले.

स्टीव्ह स्मिथ (2.20 कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्समधून बाहेर झालेल्या स्टीव्ह स्मिथसाठी बोली सुरू केली. त्यानंतर पंजाब व दिल्ली संघाने बोली वाढविली. शेवटी, 2 कोटी बेस प्राइस असलेल्या या खेळाडूला दिल्ली संघाने 2.20 कोटींमध्ये त्याच्या टीममध्ये समाविष्ट केले. 

रजत पाटीदार, सचिन बेबी (20 लाख)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सचिन बेबी आणि रजत पाटीदार यांना 20 लाखांच्या बेस प्राइसवर विकत घेतले.

पीयूष चावला (2.40 कोटी)
भारतीय संघाचा फिरकीपटू पीयूष चावलाला मुंबई इंडियन्स संघाने 2.40 कोटी रुपयात घेतले. 

अ‍ॅडम मिल्न (3.20 कोटी)
अ‍ॅडम मिल्नची बेस प्राईज 50 लाखांवर चालू झाली. आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने बोली लावण्यास सुरवात केल्यावर राजस्थानच्या संघाने देखील यात प्रवेश केला. यानंतर बोली 2.40 कोटी रुपयांवर पोहचल्यावर सन रायझर्स हैदराबादने सुद्धा रस दाखवत बोली लावण्यास सुरवात केली. मात्र शेवटी मुंबई इंडियन्सच्या संघाने अ‍ॅडम मिल्नला 3.20 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले.   

उमेश यादव (1 कोटी) 
दिल्ली कॅपिटल्स संघाने भारतीय संघाचा गोलंदाज उमेश यादवला 1 कोटीच्या बोलीसह खरेदी केले. 

नॅथन कुल्टर नाईल (5 कोटी)   
वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलला मुंबई इंडियन्सच्या संघाने 5 कोटी रुपयांना खरेदी केले. 

झाय रिचर्डसन (14 कोटी)
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने रस दाखवला. आणि  1.50 कोटींच्या बेस प्राईज पासून सुरवात झालेल्या झाय रिचर्डसनची बोली 10 कोटीवर पोहचल्यानंतर पंजाबच्या संघाने एंट्री मारल्याचे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर पंजाबच्या संघाने 14 कोटी रुपयांमध्ये झाय रिचर्डसनला आपल्या संघात घेतले.    

एम सिद्धार्थ आणि जगदीश सूचित 
भारताच्या एम सिद्धार्थ आणि जगदीश सूचित यांना खरेदी करण्यात आले आहे. 20 लाख बेस प्राईज बोलीला सुरु झालेल्या या खेळाडूंमधील एम सिद्धार्थला दिल्लीच्या संघाने विकत घेतले. तर जगदीश सूचितला सन रायझर्स हैदराबादने 30 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. 

राइली मेरिडिथ (8 कोटी)
बेस प्राईज 40 लाख असलेल्या राइली मेरिडिथ या ऑस्ट्रेलियन खेळाडूला विकत घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीच्या संघात जोरदार बोली लागली.अखेरीस पंजाब संघाने 8 कोटींची बोली लावून या खेळाडूला आपल्या संघात सामील केले. 

के गौतम (9.25 कोटी)
अनकॅप खेळाडूंच्या यादीत कृष्णाप्पा गौतम हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने 9.25 कोटींच्या बोलीसह के गौतम या अष्टपैलू फिरकीपटू खेळाडूला आपल्या संघात सहभागी करून घेतले.      

शाहरुख खान (5.25 कोटी)
शाहरुख खान या युवा खेळाडूला खरेदी करण्यासाठी पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने रस दाखवला होता. नंतर 20 लाख  बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला पंजाबच्या संघाने 5.25 कोटीला खरेदी केले. 

टॉम करन ( 5.25 कोटी)
इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनला घेण्यासाठी सन रायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात चुरस झाल्याचे पाहायला मिळाले. 1.50 कोटी रुपये बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला नंतर दिल्लीच्या संघाने 5.25 कोटी रुपये मोजून विकत घेतले. 

काईल जेमिसन (15 कोटी)
काईल जेमिसनला खरेदी करण्यासाठी पंजाब आणि बेंगलोरच्या संघात बोली लागली होती. 75 लाख बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला बेंगलोरच्या संघाने 15 कोटी रुपयांची सर्वात अधिक बोली लावून खरेदी केले. 

चेतेश्वर पुजारा (50 लाख) 
भारतीय कसोटी संघाचा खेळाडू असलेल्या चेतेश्वर पुजाराला चेन्नईच्या संघाने बेस प्राईज 50 लाख रुपयात खरेदी केले.  

मोईजेस हेनरिक्स (4.20 कोटी) 
पंजाबच्या संघाने मोईजेस हेनरिक्सला 4.20 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात सामील केले.        

हरभजन सिंग (2 कोटी)
लिलावातील दुसर्‍या फेरीत कोलकाता संघाने अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगला 2 कोटींच्या बेस किंमतीवर विकत घेतले.

केदार जाधव (2 कोटी)
केदार जाधवला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 2 कोटीच्या बेस किंमतीवर विकत घेतले.

करुण नायर (50 लाख)
दुसर्‍या फेरीच्या लिलावात करुण नायरला कोलकाता संघाने 50 लाखांच्या बोलीसह खरेदी केले. 

कुलदीप यादव (20 लाख)
राजस्थान रॉयल्सने कुलदीप यादवला 20 लाखांच्या बेस किंमतीवर विकत घेतले. 

डॅनियल ख्रिस्टीन (4.80 कोटी)
डॅनियल ख्रिस्टीनवर आरसीबी आणि कोलकाताने बोली लावली होती. मात्र त्यानंतर अखेरीस बंगळुरूच्या संघाने डॅनियल ख्रिस्टीनला 4.80 रुपयांच्या किमतीवर खरेदी केले. 

  
आयपीएल 2021 च्या लिलावातील सर्वात महाग ठरलेले खेळाडू -  

खेळाडू - बेस किंमत - विक्री

1. मुस्ताफिजुर रहमान - 1 कोटी - राजस्थान रॉयल्सने 1 कोटी देऊन खरेदी केले. 

2. उमेश यादव - 1 कोटी - दिल्ली कॅपिटलने बेस प्राइस 1 कोटीला खरेदी केले.  

3. चेतन साकारिया - 20 लाख - राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 20 लाखाला खरेदी केले. 

4. हरभजन सिंग -  2 कोटी - कोलकाता संघाने 2 कोटींच्या किंमतीवर विकत घेतले.

5. केदार जाधव -  2 कोटी -  हैदराबादने 2 कोटींच्या किंमतीवर विकत घेतले.

6. स्टीव्ह स्मिथ - 2 कोटी - दिल्ली राजधानीने 2.20 कोटींमध्ये खरेदी केले

7. पीयूष चावला - 50 लाख - मुंबई इंडियन्सने 2 कोटी 40 लाखात खरेदी केले. 

8. शाकिब अल हसन - 2 कोटी - केकेआरने 3 कोटी 20 लाखाला विकत घेतले. 

9. अ‍ॅडम मिल्न - 50 लाख - मुंबईने 3.20 कोटीमध्ये खरेदी केले. 

10. शिवम दुबे - 50 लाख - राजस्थानने 4.40 कोटींमध्ये विकत घेतले. 

11. डॅनियल ख्रिस्टीन - 75 लाख - बंगळुरूने 4.80 कोटीमध्ये खरेदी केले.  

12. नॅथन कोल्टर नाईल - 1.50 कोटी - मुंबई इंडियन्सने 5 कोटीमध्ये खरेदी केले. 

13. शाहरुख खान - 20 लाख - पंजाब किंग्जने 5 कोटी 25 लाखांमध्ये खरेदी केले. 

14. मोईन अली - 2 कोटी - सीएसकेने 7 कोटींमध्ये विकत घेतले

15. के गौतम - 20 लाख - सीएसकेने 9 कोटी 25 लाखात खरेदी केले. 

16. झाय रिचर्डसन - 1.50 कोटी - पंजाबने 14 कोटीला खरेदी केले.  

17. ग्लेन मॅक्सवेल - 2 कोटी - आरसीबीने 14 कोटी 25 लाखांमध्ये खरेदी केले 

18. ख्रिस मॉरिस - 75 लाख- राजस्थानने 16.25 कोटीमध्ये खरेदी केले. 

 

संबंधित बातम्या