महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत भारतीय युवा क्रिकेटर

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

बरेच क्रिकेटपटू आपल्या कष्टाच्या बळावर पैशाने त्वरित महागड्या कार खरेदी करतात

भारतातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजे इंडियन प्रीमियर लीग सुरू झाला आहे. इंग्लंडमधून मालिका जिंकून भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य आयपीएलच्या संघाचा भाग बनले आहेत आणि उत्तम प्रदर्शन करत आहेत. युवा क्रिकेटपटूंबद्दल बोललो तर प्रत्येक खेळाडूंच्या कामगिरीवर नजर असते. प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न असते. तसेच भारतीय युवा क्रिकेटपटू महागड्या गाड्यांचे देखील शौकीन आहे.  बरेच क्रिकेटपटू आपल्या कष्टाच्या बळावर पैशाने त्वरित महागड्या कार खरेदी करतात. चला तर मग त्या क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांच्या वाहनांची किंमती जाणून घेऊया. (Young Indian cricketers are fond of expensive cars)

IPL 2021 CSK vs RR: वानखेडेवर कोण ठरणार किंग?  

मोहम्मद सिराज 
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण केले. पदार्पणातच सिराजने उत्कृष्ट गोलांगाजी करत आपली जागा संघात बनवली.  या सिरीजमध्ये तीन सामन्यात सिराजने एकूण 13 बळी घेतले. मोहम्मद सिराज बीएमडब्ल्यू 520 (BMW 520d) डी सेडान या गाडीचा मालक आहे. या कारची किंमत 61 लाख रुपये आहे. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांनी त्याला नवीन थारही भेट म्हणून दिली आहे.

सूर्यकुमार यादव 
आयपीएलमधील कामगिरीने सूर्यकुमार यादवने सर्वांनाच चकित केले आहे. नुकताच त्याने भारत आणि इंग्लंड मालिकेत पदार्पण केले. त्याच वेळी, त्याने अलीकडेच सेकंड हाँड लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार (Range rover land rovar)  विकत घेतली आहे. जगातील सर्वोत्तम कारपैकी ही एक आहे. त्या कारची  किंमत 75 लाख रुपये आहे. सूर्यकुमार सध्या मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज आहे.

युवराज सिंग 
कोण सिक्सर किंग युवराजसिंगला ओळखत नाही. युवराजला वाहनांची खूप आवड आहे.  त्याच्याकडे मिनी कूपर कंट्रीमन गाडी  आहे.  ती गाडी  त्याची पत्नी हेजलने त्याला दिली आहे. या वाहनात स्पॉयलर विंग, कीलेस एन्ट्री सिस्टम, हेड अप डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टम, वायरलेस चार्जिंग अशी वैशिष्ट्ये आहेत. युवराज सिंगने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

IPL 2021: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अस काहीतरी घडलं

रिषभ पंत 
रिषभ पंतला पुढील धोनी म्हटले जात आहे.  रिषभ पंत सध्या आयपीएलमधील दिल्ली संघाचा कर्णधार आहे. रिषभकडे  फोर्ड मस्टंग जीटी आहे ज्याची किंमत 65 ते 70 लाख रुपयांपर्यंत आहे. रिषभ पंतकडे आणखी एक कार आहे जी मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही (GLC SUV) आहे. त्याची किंमत सुमारे 60 लाख आहे. रिषभ पंत सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावत आहे. 

ईशान किशन 
ईशान किशनला इंग्लंडविरुद्ध टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने संधी सोडली नाही आणि आपल्या कामगिरीने त्याने संघात आपले स्थान निश्चित केले. अलीकडेच ईशान किशनने बीएमडब्ल्यू एक्स 5 (BMW X5) गाडी घेतली आहे. या गाड्यांची किंमत 75 ते 80 लाख रुपये आहे. ईशान सध्या मुंबई इंडियन्स कडून आयपीएलमध्ये खेळतो. तो संघातला आघाडीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

संबंधित बातम्या