Wrestlers Protest: मास्टर ब्लास्टरच्या घराबाहेर लावले पोस्टर! कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी वाढला दबाव

Wrestlers Protest: देशातील अव्वल कुस्तीपटू गेल्या महिन्यापासून डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

Wrestlers Protest: देशातील अव्वल कुस्तीपटू गेल्या महिन्यापासून डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यात जंतरमंतर येथून कुस्तीपटूंना हटवण्यात आले.

आता सर्वात मोठी बातमी अशी येत आहे की, भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर युवक काँग्रेसने पोस्टर लावले आहेत.

त्या पोस्टरवर 'कुस्तीपटूंच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा' असे लिहिले आहे. मात्र, पोलिसांनी आता हे पोस्टर हटवले.

गंगेत पदके अर्पण करण्याची दिली धमकी

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) नुकतेच या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते, परंतु त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र, सुटका झाल्यानंतर पैलवानांनी मोठा निर्णय घेतला.

बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांसारख्या दिग्गज कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ते आता आपली पदके गंगेत अर्पण करतील.

30 मे रोजी ते हरिद्वारलाही पोहोचले होते. मात्र त्यांना हा निर्णय घेण्यापासून रोखण्यात आले. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला आणखी 5 दिवसांची मुदत दिली आहे.

Sachin Tendulkar
Wrestlers Protest: 'कुठे येऊ गोळी खायला, शप्पथ घेऊन सांगतो...', पूर्व डीजीपीच्या इशाऱ्यावर बजरंग पुनियाचं चोख प्रत्युत्तर

कुस्तीपटूंना ब्रिजभूषणची अटक हवी आहे

एप्रिल महिन्यापासून बजरंग पुनिया (Bajrang Punia), विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक पैलवान आंदोलन करत आहेत. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

ब्रिजभूषण यांच्या विरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com