मास्टर-ब्लास्टरनंतर युसुफ पठाण कोरोना पॉझिटिव्ह

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यानंतर त्वरित कोरोना चाचणी करुन घेतली यामध्य़े माझा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई: सचिन तेंडूलकर नंतर विस्फोट फलंदाज युसुफ पटाणला कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती युसुफने स्वत:हा ट्विट करुन दिली आहे. 21 मार्च रोजी रायपूरमध्ये पार पडलेल्या रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये सचिन आणि युसुफ यांनी एकत्रीत इंडिया लिजेंड्सकडून सहभागी झाले होते. भारत लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा पराभव करत रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये विजेतेपद संपादन केले होते.

युसुफ पठाणने ट्वीटमध्ये म्हटले की, '' कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यानंतर त्वरित कोरोना चाचणी करुन घेतली यामध्य़े माझा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. आपण स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले असून डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत आहे. मी सर्वांना निवेदन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी.'' (Yusuf Pathan corona positive after master blaster)

सचिनच्या कोरोना पॉझिटिव्ह ट्विटवर पीटरसनचा प्रश्न, युवीने दिला असा रिप्लाय

सचिनने ही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्य़ानंतर ट्विट करुन माहिती दिली होती. ''कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी सतत सर्व नियमांचे पालन करतो. तसेच मी अनेकदा कोरोना चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसून येत होती. मी स्वत:ला घरीच होम क्वॉरंटाइनही करुन घेतले आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्य़ा सूचनांचे पालन मी करत आहे,'' असं सचिन ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. देशात लसीकरणाला सुरु असतानाही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  

 

संबंधित बातम्या