6 षटकार लगावल्यानंतर युवराज व गिब्सने पोलार्डला अशा दिल्या शुभेच्छा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

श्रीलंकेच्या फिरकीपटू अकिला धनंजयच्या एका षटकात पोलार्डने 6 षटकार लगावले. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्स आणि भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. पोलार्डच्या या पराक्रमामुळे युवराज सिंग आणि हर्षेल गिब्स दोघेही खूष दिसले. दोघांनी ट्विट करुन या कॅरेबियन फलंदाजाचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन T20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. श्रीलंकेच्या फिरकीपटू अकिला धनंजयच्या एका षटकात पोलार्डने 6 षटकार लगावले. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्स आणि भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. हर्षेल गिब्सने सर्वप्रथम हा पराक्रम केला होता. 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात नेदरलँड्सचा गोलंदाज डॅन व्हॅन बंगे यांच्या एका षटकात सर्व चेंडूंवर त्याने षटकार लगावले. 2007 मध्येच सप्टेंबरमध्ये युवराजने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरूद्ध हर्षेल गिब्सच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.

...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर  

स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 6 षटकार ठोकले. युवराज T20 स्वरूपात असे करणारा पहिला फलंदाज होता. पोलार्डने गुरुवारी त्याच्या विक्रमाची बरोबरी केली. पोलार्डच्या या पराक्रमामुळे युवराज सिंग आणि हर्षेल गिब्स दोघेही खूष दिसले. दोघांनी ट्विट करुन या कॅरेबियन फलंदाजाचे अभिनंदन केले. युवराजने 6 षटकारांच्या क्लबमध्ये आपले स्वागत आहे, असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे गिब्सने एकामागून एक ट्विट करून पोलार्डच्या षटकारांचे कौतुक केले. त्यांनी ते मुंबई इंडियन्सशीही जोडले. गिब्जने ट्विटमध्ये लिहिले की असे दिसते आहे की मार्च हा 6 षटकार ठोकण्याचा सर्वात आवडता महिना आहे. त्यांने हा विक्रम 16 मार्च 2007 ला केला होता. 

आता इंझमामने देखील खेळपट्टीवरुन दिली प्रतिक्रिया

पोलार्डने 11 चेंडूत 38 धावा केल्या

या सामन्यात पोलार्डने 11 चेंडूत 38 धावा केल्या. त्यापैकी 36 धावा सहा  षटकारांसह केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विशेष बाब म्हणजे अकिलाने त्याच्या दुसर्‍याच षटकात सलग तीन चेंडूंमध्ये एव्हिन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरनला बाद करून आपल्या विकेट्सची हॅटट्रिक पूर्ण केली होती. त्यामुळे विकेट्सच्या हॅट्रिकबरोबरच त्याच सामन्यात सहा षटकार खाणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. यामुळे त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यातील रेकॉर्डसमुळे सगळेच चकित झाले आसून, भारतीय फलंदाज वसीम जाफरनेदेखील हे अनाकलनीय आहे, असे ट्विट जाफरने  वेस्ट इंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डचे कौतुक केले. मागील षटकात विकेट्सची हॅटट्रिक केलेल्या स्पिनर अकिला धनंजयाविरूद्ध पोलार्डने कामगिरी केल्याचा उल्लेख वसिम जाफरने यावेळी केला. 

वेस्ट इंडीजने 41 चेंडूत सामना जिंकला

सामन्यात विंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावल्यानंतर केवळ 131 धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजने 41 चेंडूत 6 गडी गमावून 134 धावा करुन सामना जिंकला. पोलार्डने 6 षटकार ठोकत सामनावीर ठरला.

संबंधित बातम्या