युवराज सिंग निवृत्ती मागे घेणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

पंजाब क्रिकेटच्या भल्यासाठी तू निवृत्ती मागे घेऊन पुन्हा पंजाब संघाची सेवा कर, अशी मागणी पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव पुनील बाली यांनी युवराज सिंगकडे केली होती

नवी दिल्ली: पंजाब क्रिकेट संघटनेच्या विनंतीस मान देऊन भारताचा वर्ल्डकप हिरो फलंदाज युवराज सिंगने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील निवृत्ती मागे घेतली आहे. वर्षभरापूर्वी युवराज सर्व श्रेणीतून निवृत्त झाला होता.

पंजाब क्रिकेटच्या भल्यासाठी तू निवृत्ती मागे घेऊन पुन्हा पंजाब संघाची सेवा कर, अशी मागणी पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव पुनील बाली यांनी युवराज सिंगकडे केली होती, किमान ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तरी युवराज पंजाब संघातून खेळणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या