युवराज सिंग पुन्हा मैदानात?; जोरदार तयारी सुरू करत दिले खेळणार असल्याचे संकेत

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

भारतीय क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली आहे. परंतु, युवराज पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

नवी दिल्ली-  भारतीय क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली आहे. परंतु, युवराज पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑस्ट्रेलियात अनलॉक झाले. मात्र, देशांतर्गत क्रिकेट सय्यद मुश्ताक अली टी-२०च्या मंचावर अनलॉक होणार आहे. या स्पर्धेसाठी पंजाबच्या संघाने तीस सदस्यीय संघ जाहीर केला असून यात युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे.    

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे युवराज सिंगने जाहीर केले होते. मात्र, पंजाब क्रिकेट असोशिएशनने त्याला आपल्या संघात खेळण्याची विनंती केली होती. त्यानेही होकार दर्शवला होता. मात्र, तो खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पीसीएचे सचिव पुनीत बाली यांनी युवराजच्या होकाराची वाट बघत असल्याचे सांगितले आहे. 

सय्यद मुश्ताक अली टी -ट्वेन्टी स्पर्धा 10 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार असल्याचे नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केले आहे. तर युवराज सिंगने देखील पुन्हा सराव सुरु केला आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर नेट प्रॅक्टिस करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो उत्तम फटका लावताना दिसत आहे.       

पुढील वर्षात १० जानेवारीपासून त ३१ जानेवारीपर्यंत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी युवराज सिंगनेही सराव सुरू केल्याचे त्याच्या इन्स्टाग्रॅम पोस्टमध्ये दिसत आहे.  


 

संबंधित बातम्या