ऑस्ट्रेलियातील बिग बॅशमध्ये खेळण्याची युवराजची तयारी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

टीम इंडियाचा माजी आक्रमक फलंदाज युवराज सिंग आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्‌वेन्टी-२० स्पर्धेत खेळण्यास तयार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघाची चाचपणीही करत आहे.

मेलबर्न: टीम इंडियाचा माजी आक्रमक फलंदाज युवराज सिंग आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्‌वेन्टी-२० स्पर्धेत खेळण्यास तयार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघाची चाचपणीही करत आहे.

बिग बॅशमध्ये आत्तापर्यंत कोणताही भारतीय पुरुष खेळाडू खेळलेला नाही. निवृत्त न झालेल्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यास बीसीसीआय परवानगी देत नाही. महिलांच्या लीगमध्ये मात्र भारतीय महिला खेळाडू खेळल्या आहेत.

युवराजने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतलेला आहे. त्यामुळे तो परदेशातील लीगमध्ये खेळू शकणार आहे. युवराजचे व्यवस्थापक जेसन वॉर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया युवराजसाठी फ्रॅंचाईसकडे चाचपणी करत आहेत.  

युवराज सिंगसारख्या खेळाडूचे आम्ही स्वागतच करू, असे बीबीएलमध्ये खेळणारा आणि आयपीएलमध्ये चेन्नई संघातून खेळणाऱ्या शेन वॉटसनने सांगितले. भारतामध्ये ट्‌वेन्टी-२० प्रकारासाठी उपयुक्त असलेले उच्चस्तरीय अनेक खेळाडू आहेत; पण त्यांना देशाकडून खेळण्याची संधी मिळत नाही, अशा खेळाडूंना बिग बॅशमध्ये खेळण्यास बीसीसीआयने परवानगी द्यावी, असेही वॉटसन म्हणाला.

संबंधित बातम्या