वर्ल्डकपसाठी युझवेंद्र चहल घेणार वरुण चक्रवर्तीची जागा?

टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakraborty) जागा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) घेणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
वर्ल्डकपसाठी युझवेंद्र चहल घेणार वरुण चक्रवर्तीची जागा?
Varun Chakraborty & Yuzvendra ChahalDainik Gomantak

आयपीएलच्या (IPL) हंगामाची अखेर आणि वर्ल्डकप (World Cup) स्पर्धेची सुरुवात दोन्ही आता जवळ जवळ येऊ लागले आहेत. यातच टीम इंडियाच्या (Team India) संघ रचनेबाबत बहुतेक सर्वच जण आडाखे बांधू लागले आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakraborty) जागा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) घेणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

Varun Chakraborty & Yuzvendra Chahal
भारतात टी -20 वर्ल्डकप खेळणं अवघड; 'घरवापसी' नंतर ऑस्ट्रेलियन दिग्गजाची 'मन की बात'

वर्ल्डकपसाठी 10 ऑक्टोबरपर्यंतच संघात बदल करता येणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेचे बिगुल वाजेपर्यंत इंडियन प्रिमिअर खेळणाऱ्या भारतीय खेळांडूच्या दुखापतींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या बदलातच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) नाव आले होते. मात्र दुसरीकडे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी हार्दिक त्याच्या वाट्याला येणारी चार षटके टाकेल असे सांगितले आहे. प्रत्यक्षात इंडियन प्रिमिअर लीगमध्ये तो अद्याप गोलंदाजी करु शकलेला नाही. दुसरीकडे फ्रचांयझीचे प्रशिक्षक सांगत आहेत की, हार्दिकला भारतासाठी राखून ठेवण्यात आले आहे. तसेच तो फलंदाजीही करु शकलेला नाही. तसेच टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी पांड्याने गोलंजदाजी न करणे हे टीम इंडियासाठी चांगले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याची जागा शार्दुल ठाकूर किंवा श्रेयस अय्यरची निवड समिती करेल अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

Related Stories

No stories found.