विश्‍वकरंडक सुपर लीग क्रमवारीत क्रमवारीत झिम्बाब्वे, आयर्लंडही टीम इंडियापेक्षा सरस ; ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग क्रमवारीत विराट कोहलीचा भारतीय संघ अखेरच्या सहाव्या क्रमांकावर आहे. आयर्लंड तसेच झिम्बाब्वेने सध्या भारतास मागे टाकले आहे. षटकांची गती न राखल्यामुळे भारतास एका गुणाचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे भारत मागे पडला आहे. 

मुंबई :  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग क्रमवारीत विराट कोहलीचा भारतीय संघ अखेरच्या सहाव्या क्रमांकावर आहे. आयर्लंड तसेच झिम्बाब्वेने सध्या भारतास मागे टाकले आहे. षटकांची गती न राखल्यामुळे भारतास एका गुणाचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे भारत मागे पडला आहे. 

या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सहा सामन्यांनंतर ४० गुणांसह पहिले आहेत, तर भारत ९ गुणांसह सहावा आहे. इंग्लंड ३० गुणांसह दुसरे, तर पाकिस्तान २० गुणांसह तिसरे आहेत. भारताप्रमाणेच पाकिस्तान, झिम्बाब्वे (१०), आयर्लंड (१०) हे प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. 

आयर्लंड तसेच झिम्बाब्वे हे अनुक्रमे इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत भारताप्रमाणेच १-२ पराजित झाले. या सुपर लीगमध्ये विजयासाठी दहा गुण देण्यात येतात. मात्र भारताने षटकांची गती न राखल्याने भारतास एका गुणाचा दंड करण्यात आला. त्यामुळे भारताचे गुण नऊ झाले. झिम्बाब्वे, आयर्लंडपेक्षा सरस धावगती असूनही भारतास मागे जावे लागले. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश एकही सामना न खेळल्याने सध्या त्यांना या क्रमवारीत स्थान नाही. 
भारताचा थेट प्रवेश . भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी या सुपर लीग क्रमवारीतील अव्वल सात संघांना थेट प्रवेश असेल. यजमान असल्याने भारताचा प्रवेश निश्‍चित आहे.

 

अधिक वाचा :

भारत - ऑस्ट्रेलियाच्या टी २० लढतीही हाऊसफुल?

एटीके मोहन बागान आयएसएलमध्ये विजयी हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील

एफसी गोवाच्या रेडीमवर कडक कारवाई ;  आणखी एका आयएसएल सामन्यासाठी निलंबित

 

संबंधित बातम्या