भात पिकाखालील क्षेत्र वाढवणार

Paddy seed distribuition in canacona
Paddy seed distribuition in canacona

काणकोण 

राज्यात खाजन जमिनी भात पिकाखाली आणण्यासाठी  कृषी खात्याची योजना आहे.काणकोणात एकूण २० हजार हेक्टर जमीन खाजन जमिन प्रकारातील आहे. खाजन जमिनीचा उपयोग मिठागरे,मत्स्यपैदास,भाजी लागवड यासाठी पूर्वी करण्यात येत होता.मात्र भात लागवड योग्य खाजन जमिनी पडीक ठेवण्याकडे जमिनमालकाचा कल गेल्या काही वर्षात वाढलेला आहे.कोवीड-१९ च्या लॉकडाऊनमुळे सर्व प्रदेशाना स्वावलंबी बनण्याची गरज पटवून दिली आहे.राज्यात ही शेत जमिनी पडीक ठेवण्याकडे जमिनदाराचा वाढता कल आहे.स्वालंबनासाठी भातपीक वाढवणे गरजेचे आहे.त्यासाठी उपलब्ध जमीन पिकाखाली आणण्याची काळाची गरज आहे.यासाठी राज्यातील खाजन जमिनीकडे कृषी खात्याने विशेष लक्ष दिले आहे.काणकोणात खाजन जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी कृषी खात्याने भारतीय कृषी अनुसंधान केंद्राने खाजन जमिनीत लागवड करण्यासाठी विकसीत केलेल्या गोवा धन-१,गोवा धन-३,गोवा धन-४ या भात बियाणांची विनामुल्य शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे असे  विभागीय कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी सांगितले. राज्याबरोबरच काणकोण तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने तांदळाचे पीक वाढवणे गरजेचे आहे.

...काणकोणात ४० हेक्टर जमिन भाजी लागवडीखाली...

काणकोणात ४० हेक्टर जमिन भाजी पिकाखाली आहे.त्यात गेल्या दोन वर्षात सातत्याने वाढ होत आहे.दिवसाकाठी ४ते ५टन व तीन महिन्यात एक जार टन भाजीचे पिक काणकोणातून घेतले जात आहे.पावसाळ्यात डोंगरी भागात भाजीचे पीक घेण्यात येते.यंदा लॉकडाऊनमुळे उन्हाळ्यात भाजीची दुसऱ्या फेरीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.काणकोण मधील भाजी पीक शेतकऱ्याकडून हॉर्टिकल्चर महामंडळाला लॉकडाऊन काळात भाजीचा पुरवठा करण्याबरोबरच स्थानिक नागरीकाचीही भाजीची गरज भागवली आहे.लॉकडाऊन काळात गरजवंत नागरीकानी शेतकऱ्यांच्या मळ्यात जाऊन भाजीची खरेदी केली आहे .दुसऱ्या फेरीच्या लागवडीसाठी त्यांना भाजी बियाणी उपलब्ध करून दिल्याचे कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी सांगितले.या काळात तारीर येथील टाटा कोमरपंत याना एक किलो पालक भाजीची बियाणी उपलब्ध करून देऊन त्यांनी त्याची लागवड केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com