बिबट्याच्या हल्यात शिवारआंबेरेत गाय ठार 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

रत्नागिरी :ग्रामस्थांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष 
तालुक्यातील शिवारआंबेरे येथील बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे.काल (ता. १३) रात्री आणखी एका गाईला बिबट्याने आपले भक्ष्य केले.यामुळे शिवारआंबेरे येथील ग्रामस्थ,शेतकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत. 

रत्नागिरी :ग्रामस्थांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष 
तालुक्यातील शिवारआंबेरे येथील बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे.काल (ता. १३) रात्री आणखी एका गाईला बिबट्याने आपले भक्ष्य केले.यामुळे शिवारआंबेरे येथील ग्रामस्थ,शेतकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत. 
रविवारी शेतकरी सुरेश नारायण पेजे यांची गाय बिबट्याने मारली.त्याआधी तुकाराम भिकाजी सुतार यांचा चार वर्षाचा पंड्या बिबट्याने मारला होता.त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र शिर्सेकर यांना माहिती दिली.त्यांनी वन विभागाला दूरध्वनीद्वारे कळविले आहे.समस्त ग्रामस्थांच्या जीवाला धोका असूनही संबंधित विभाग लक्ष्य देत नाही. मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही.त्यानंतर वारंवार गावात बिबट्याचा होणार हल्ला,शेतकऱ्यांचे होनारे नुकसान यांबाबत शिर्सेकर व शेतकरी यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.त्या निवेदनात वन विभागाने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून ग्रामस्थांची मदत करावी .आणि या बिबट्याच्या भीतीपासून सुटका करावी .दोन शेतकऱ्यांची गुरे बिबट्याने मारली आहे.बिबट्याच्या भीतीपोटी ग्रामस्थांना तसेच शाळेतील विद्यार्थाना गावामध्ये फिरणे कठीण झाले आहे.संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

शाळेत मुलांना पाठवायचे की नाही ...?
शिवारआंबेरे येथे गेले दोन दिवस बिबट्या जनावरांना भक्ष्य करीत असल्याने जनावरांना चाऱ्यासाठी सोडणेही कठीण झाले.शाळेत मुलांना पाठवायचे की नाही,हा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे. 

"वाढत्या वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल "

संबंधित बातम्या