पर्यावरणाच्या रक्षणाद्वारे देशसेवा करूया

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

तुळशीदास गावस : चांदेल येथे हुतात्‍मा तुकाराम गावस यांना आदरांजली

चांदेल येथे हुतात्‍मा तुकाराम केशव गावस यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना तुळशीदास गावस. बाजूला सरपंच संतोष मळीक, महादेव गवंडी, उद्योजक श्याम शेट्ये व इतर मान्‍यवर.

मोरजी : आपली प्रबळ इच्‍छाशक्‍ती असेल, तर देशसेवा कोणत्याही पद्धतीने करता येते. देशात चांगला बदल घडविण्‍यासाठी अगोदर आपल्याला बदलावे लागेल. प्लास्टिकमुक्त देश करण्यासाठी जनजागृतीसाठी सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्‍यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून देशसेवा म्हणून पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशसेवा करूया, असे आवाहन उद्योजक तुळशीदास गावस यांनी केले.

चांदेल येथील वीर जवान, हुतात्‍मा तुकाराम केशव गावस यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे २६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी चांदेल, हसापूरचे सरपंच संतोष मळीक , पत्रकार महादेव गवंडी , उद्योजक श्याम शेट्ये पंच रसिका शेटकर, वीर पत्नी लीला गावस, अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेचे उपाध्यक्ष कॅप्‍टन वामन नाईक, सचिव रामदास महाले, भालचंद्र आमोणकर, अनिल बोंद्रे यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन अनिल बोंद्रे व साहिल कळंगुटकर यांनी केले. रामदास महाले, भालचंद्र आमोणकर, वामन नाईक, तुळशीदास कोरगावकर, सुधाकर नाईक आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भालचंद्र आमोणकर यांनी प्रास्‍ताविक व साईल कळंगुटकर यांनी परिचय करून दिला. सुरवातीला स्मारकाकडे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्‍यास आली.

५० हजारांची देणगी
यावेळी उद्योजक तुळशीदास गावस यांनी सैनिक कल्याण संघटनेच्‍या कार्याची प्रेरणा घेऊन संघटनेला आपल्याकडून रोख पन्नास हजार रुपये देणगी जाहीर केली. उद्योजक श्याम शेट्ये यांनी बोलताना देशाची सेवा करताना हौतात्‍म्‍य प्राप्त झाले. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्‍यात आली. वीर पत्नीने तारुण्यात खूप सोसले. तब्बल ५५ वर्षे त्यांनी केवळ त्यांच्या आठवणींवर दिवस काढले, त्या वीर पत्नीला आमचा सलाम, असे ते म्हणाले. सरपंच संतोष मळीक यांचेही यावेळी भाषण झाले. पत्रकार महादेव गवंडी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली.
माध्यमिक पातळीवर घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेत सरकारी प्राथमिक विद्यालय, वझरी यांना प्रथम, व्हायकाऊंट हायस्कूल पेडणे यांना दुसरे, तर तिसरा क्रमांक सरकारी हायस्कूल दाडाचीवाडी-धारगळ, सरकारी हायस्कूल चांदेल व सरकारी हायस्कूल तोरसे यांना उत्तेजानार्थ बक्षिसे प्राप्‍त झाली.
उच्च प्राथमिक विद्यालय स्‍तरीय स्‍पर्धेत सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय, नागझर यांना प्रथम व दुसरे सरकारी विद्यालय कासारवर्णे, तर सरकारी प्राथमिक विद्यालय, हसापूर यांना तिसरे आणि सरकारी विद्यालय तोरसे व उच्च माध्‍यमिक विद्यालय मोप पेडणे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्‍त झाली.
 

मयेत ३५० लाभार्थ्यांना ‘गृहआधार

संबंधित बातम्या