टाळेबंदीमध्येही एलआयसीची उत्कृष्ट कामगिरी 

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

गोवा विभागाकडे सध्या 11 लाख पॉलिसीज आहेत.  2019-20 या आर्थिक वर्षात 66897 पॉलिसींच्या माध्यमातून 217.05 कोटी रुपये प्रथम वर्ष प्रिमिअम म्हणून प्राप्त केले, पॉलिसींमध्ये 1.65% वाढ झालेली आहे.

पणजी

कोविड-१९ लॉकडाऊनमुळे एकीकडे उद्योग संकटात असताना भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळ (एलआयसीने) चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच संपलेल्या 2019-20 या आर्थिक वर्षात एलआयसीने 2.19  कोटी पॉलिसींच्या माध्यमातून  51,227 कोटी रुपये पहिल्या वर्षीचा प्रिमिअम मिळवला आहे. पॉलिसी संख्या आणि प्रिमिअम दोन्ही आघाडीवर एलआयसीने चांगली कामगिरी केली आहे. तसेच सिंगल प्रिमिअमच्या माध्यमातून 21,967 कोटी रुपये आणि नॉन सिंगल प्रिमिअमच्या माध्यमातून 29260 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. सिंगल प्रिमिअमचे प्रमाण 42.88 आणि नॉन सिंगल प्रिमिअमसाठी  57.12 आहे. 

एकूण, एलआयसीने प्रभावी अशी 25.17%  वाढ साध्य केली आहे. खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी फक्त 11.64.% वाढ साध्य केली आहे. एलआयीचा बाजारपेठेतील हिस्सा आणि प्रथम वर्ष प्रिमिअमचा वाटा 31 मार्च 2020 पर्यंत  अनुक्रमे 75.90% and 68.74% होता, म्हणजे पॉलिसी संख्येत 1.19% आणि प्रथम वर्ष प्रिमिअममध्ये 2.50% वाढ झालेली आहे. 31.3.20 पर्यंत लॉकडाऊनमध्येही एलआयसीने 2.03 कोटी मॅच्युरिटी आणि मनी बॅक क्लेम आणि ऍन्युटीज निकालात काढले आहेत. तसेच 7.50 लाखाचे मृत्यूचे दावेही निकालात काढले.  मार्च 2020 आणि एप्रिल  2020 चे वार्षिक देयकही पूर्ण केले. 

गोवा विभागाकडे सध्या 11 लाख पॉलिसीज आहेत.  2019-20 या आर्थिक वर्षात 66897 पॉलिसींच्या माध्यमातून 217.05 कोटी रुपये प्रथम वर्ष प्रिमिअम म्हणून प्राप्त केले, पॉलिसींमध्ये 1.65% वाढ झालेली आहे. एकूण 3680 विमा प्रतिनिधी आहेत, त्यापैकी 112  विमा प्रतिनिधी शतकवीर, 16 करोडपती आणि  52 जण मिलिअन डॉलर राऊंड टेबल परिषदेसाठी पात्र ठरले आहेत. 

2019-20 वर्षात, गोवा विभागाने 103314 मॅच्युरिटी  आणि मनी बॅक असे एकूण 531.43 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले. तसेच 36.35 कोटी रुपयांचे  2874 मृत्यू दावेही निकाली काढले.  

 

 

संबंधित बातम्या