जीवरक्षकांचा आज विधानसभेवर मोर्चा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पणजी:  सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यातील जीवरक्षकांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून  बुधवारी सकाळी ११.३० वाजता विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाती केरकर यांनी दिली.

गोवा जीवरक्षक संघटनेचे गेल्या अडीच महिन्यांहून अधिक दिवस आंदोलन सुरू आहे. दृष्टी कंपनीकडे काम करणाऱ्या या जीवरक्षकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असून, गोव्यातील असलेल्या या युवकांवर येथील सरकार अन्याय करीत आहे. अडीच महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून ठिकठिकाणी या जीवरक्षकांनी आंदोलन केले आहे. बुधवारी सकाळी आझाद मैदानाहून १८ जून रस्ता मार्गे बसस्थानक आणि क्रांती सर्कलापासून पुलावरून विधानसभेकडे मोर्चा निघेल. मोर्चा शांततेत निघणार असल्याचे केरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या