लिटल गौर्स लीग स्पर्धा यशस्वी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

पणजी : फोर्सा गोवा फौंडेशनची लिटल गौर्स लीग फुटबॉल स्पर्धा यशस्वी ठरली. ६, ८, १०, १२ वयोगटातील मुला व मुलींसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राज्यभरातील शंभरहून जास्त संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेतील सामने उत्तर गोव्यात सांगोल्डा मैदानावर, दक्षिण गोव्यातील नावेलीतील नागमोडे मैदानावर, तर वास्कोतील माऊंट लिटेरा झी मैदानावर झाले. सुमारे ३ महिने चाललेल्या या स्पर्धेत ९५७ युवा खेळाडूंची नोंदणी झाली. त्यात १६९० गोलांची पाऊस पडला.

सांगोल्डा येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यास भारताच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक बिबियान फर्नांडिस, हैदराबाद एफसीचा खेळाडू साहिल ताव्होरा, एफसी गोवाचा १८ वर्षांखालील खेळाडू जोनाथन कार्दोझ, एफसी गोवाचा माजी खेळाडू डेन्झिल फ्रान्को यांची उपस्थिती होती. नागमोडे मैदानावर माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, एफसी गोवा विकसनशील संघाचा खेळाडू एरेन डिसिल्वा, भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉमियाना गोमेंडिस यांची उपस्थिती होती. वास्को येथील बक्षीस वितरण सोहळ्यास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या गोवा विभागीय समन्वयक जेनेव्हिव कुलासो, गोवा फुटबॉल असोसिएशनचे सदस्य फ्रान्सिस नुनीस, फुटबॉल प्रशिक्षक उमर मुतावाली यांची उपस्थिती होती.

स्पर्धेतील विजेते-उपविजेते संघ
उत्तर गोवा : ६ वर्षांखालील : प्ले गोवा ए, जीएमएस युनायटेड, ८ वर्षांखालील : जीएफडीसी सावईवेरे, डॉन बॉस्को ओरेटरी, १० वर्षांखालील : सेंट जोसेफ हायस्कूल, अपोलो फुटबॉल अकादमी, १२ वर्षांखालील मुली : सारस्वत विद्यालय, प्रिन्सेस पी सेंट थॉमस.

दक्षिण गोवा : ६ वर्षांखालील : एफसी वायएफए, टीकेएस रुबीस, ८ वर्षांखाली : एफसी वायएफए, जीएफडीसी नावेली, १० वर्षांखालील : एसएफएक्स वॉईज फातोर्डा, जीएफडीसी नावेली, १२ वर्षांखालील मुली : जीएफडीसी नावेली, मनोविकास.

वास्को विभाग : ६ वर्षांखालील : रेजिना मुंडी, ट्विंकलिंग स्टार्स, ८ वर्षांखालील : एफसी मरिना, टायनी गोल्स अकादमी, १० वर्षांखालील : साळगावकर फुटबॉल क्लब, रेजिना मुंडी अकादमी, १२ वर्षांखालील मुली : टायनी गोल्स अकादमी, मरिना एफसी.

संबंधित बातम्या