ऑनलाईन खरेदीमुळे दुकानदारांपुढे संकट

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

म्हापसा:म्हापसा बाजारपेठेतील व्यवसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात. आज दुकानात विकणारे साहित्य रस्त्यावर विक्री होत आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर संकट ओढवले आहे.आजची तरुणाई ऑनलाईन शपींग करत असल्यामुळे मागच्या काही वर्षांपासून बाजारपेठेवर या ऑनलाईन खरेदीचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले आहे.या दुकानामध्ये नामांकीत कंपन्यांचे उत्पादने विक्रीस उपलब्ध असले तरी आज ही उत्पादने ॲमेझॉनवर, फ्लीपकार्ड व इतर या ऑनलाईन कंपनीच्या माध्यमाद्वारे विकली जात आहे. ग्राहकांना दुकानात ही उत्पादने खरेदी करत असताना छापलेली रक्कम देऊन खरेदी करावी लागते, तर या ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांना सूट मिळते.

म्हापसा:म्हापसा बाजारपेठेतील व्यवसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात. आज दुकानात विकणारे साहित्य रस्त्यावर विक्री होत आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर संकट ओढवले आहे.आजची तरुणाई ऑनलाईन शपींग करत असल्यामुळे मागच्या काही वर्षांपासून बाजारपेठेवर या ऑनलाईन खरेदीचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले आहे.या दुकानामध्ये नामांकीत कंपन्यांचे उत्पादने विक्रीस उपलब्ध असले तरी आज ही उत्पादने ॲमेझॉनवर, फ्लीपकार्ड व इतर या ऑनलाईन कंपनीच्या माध्यमाद्वारे विकली जात आहे. ग्राहकांना दुकानात ही उत्पादने खरेदी करत असताना छापलेली रक्कम देऊन खरेदी करावी लागते, तर या ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांना सूट मिळते. कमीत कमी ५०० रुपयांची खरेदी केल्यास घरबसल्या सामान घरपोच मोफत मिळते. तसेच खरेदी केलेला माल नको असल्यास तो पुन्हा त्या कंपनीला पाठविता येतो. यामुळे आज सर्वजण ऑनलाईन खरेदी करण्यावर भर देत आहेत. म्हापसा बाजारपेठेतील कडधान्य विक्री करणारे दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात. म्हापसा नगरपालिकेने बाजारपेठेच्या अनेक प्रवेशद्वारांवर गेट घातल्यामुळे दुचाकी वाहने बाजारात घेऊन यायला प्रवेश मिळत नाही. २५ किलोची तांदुळाची पोती कुठल्याही कडधान्य दुकानदारांकडून विकत घेतल्यानंतर ती कशी बाजाराच्या बाहेर पार्क करुन ठेवलेल्या गाडीकडे कशी न्यावी हा प्रश्‍न चिन्ह ग्राहकांपुढे पडतो. पूर्वी बाजारात हमाली करणारे माणसे भेटली पण आज ही माणसे सुद्धा बाजारातून गायब झालेली आहे. त्यामुळे आजचा ग्राहक म्हापसा बाजारपेठेत जाऊन कडधान्याची खरेदी करण्याचे टाळतात व ही मंडळी म्हापसा बाहेरील कडधान्यांच्या दुकानामध्ये खरेदी करतात.
कापड व तयार कपडे विकणारे व्यापारी आपली दुकाने थाटून बसले आहेत. या मंडळींना पालिकेकडून व्यवसाय दाखला तसेच विद्युत खात्याकडून विद्युत पुरवठा करण्याची परवानगी, सरकारला विक्री कर तसेच हिशेब सांभाळणे, चार्टर अकाऊंटन्टची फी असे अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. पण फेरी विक्रेत्यांना कपड व तयार कपडे विक्री करत असताना अशा प्रकारच्या कसल्याच परवानगीची व करावी सक्ती नसते. दुकानातील दुकानदार नामांकित कंपन्यांचे तयार करण्याचे उत्पादने विक्रीस ठेवतात. तर फेरी विक्रेते कमी दर्जाचा माल विक्री करतात. दुकानदाराला ग्राहकांना फसवता येत नाही. ग्राहकाला दर्जात्मक उत्पादन देऊन पुन्हा ग्राहक आपल्या दुकानात खरेदीसाठी यावा, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात तर फेरी विक्रेते कमी दर्जाचा माल विकून पसार होतात. या बिगर गोमंतकीय फेरी विक्रेत्यांनी गोमंतकीय व्यापाऱ्यापुढे आव्हान उभे करून ठेवले आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याला पराकाष्ट करावी लागते.

ठोस कृती आखण्याची गरज
म्हापसा बाजारपेठेत गेल्या ५० वर्षांपासून आपला परंपरिक व्यवसाय सांभाळणारे दुकानदार अनेक अडचणीमुळे आज ग्राहकांपासून तुटत आहेत. जगात आर्थिक मंदिचा काळ असल्यामुळे म्हापशातील ही व्यापारी मंडळीसुद्धा या आर्थिक मंदितून आपला प्रवास करीत आहेत. काही व्यापारी तर सकाळी दुकान उघडल्यानंतर दुपारपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास या व्यापाऱ्यांवर संकट कोसळण्यास विलंब लागणार नाही. म्हापसा नगरपालिकेने या गेटच्या संदर्भात व्यापारी मंडळींचा विचार करुन ठोस कृती आखण्याची गरज आहे.

बार्देश तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर जमीन लवकरच पाण्याखाली​
नगरपालिका, आरोग्य खात्याची गांधारीची भूमिका...
म्हापसा बाजारपेठेतील रस्त्यावर मसाला विक्री करणारे फेरी विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मसाला विक्री करणाऱ्या फेरी विक्रेत्यांनी मोठ-मोठ्या जागा अडवून आपला व्यवसाय चालवला आहे. म्हापसा नगरपालिकेने कायद्याचा भंग करून या मसाला विक्री करणाऱ्या फेरी विक्रेत्यांना व्यवसाय दाखला दिला आहे. या मसाला फेरी विक्रेत्यांकडे आरोग्य खात्याचे परवाने नाहीत. उघड्यावर ही मंडळी व्यवसाय करतात. नगरपालिका मंडळ व आरोग्य खाते गांधारीची भूमिका बजावत आहेत. आज या मसाला फेरीविक्रेत्यांपुढे सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे दिसत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची हमी खरी तर सरकारने घेण्याची गरज असताना सरकारच अशा बेकायदेशीर व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. या विक्रेत्यांकडे दर्जात्मक माल विक्रीस उपलब्ध नसतो. ग्राहकांना दुकानापेक्षा या फेरी विक्रेत्यांकडे स्वस्त दरात माल विक्रीस मिळत असल्यामुळे काही ग्राहक या फेरी विक्रेत्या मसाला विक्रेत्यांकडे माल खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

 

संबंधित बातम्या